दिनांक 25 May 2020 वेळ 1:49 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » सफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास

सफाळे : चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपील 2 वर्षांचा कारावास

राजतंत्र न्युज नेटवर्क/सफाळे, दि. 19 : भरधाव दुचाकीवरुन येऊन रस्त्याने चालणार्‍या 21 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढणार्‍या आरोपीला न्यायालयाने 2 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सफाळ्यातील दरभेपाडा येथे राहणारी सौ. शिल्पा राजेश रिंजड ही महिला 29 सप्टेंबर 2013 रोजी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास आपल्या सासुसोबत घरी परतत असताना मागुन भरधाव वेगात दुचाकीवरुन आलेल्या प्रभाकर बबन गिराणे (वय 27, रा. सरतोडी, जि. ठाणे) याने शिल्पा रिंजड यांच्या गळ्यातील मंगळसुत्र खेचून पळ काढला होता. याप्रकरणी सफाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी प्रभाकर गिराणे याला ताब्यात घेतले होते. हा खटला न्यायालयासमोर सुनावणीसाठी आल्यानंतर पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी प्रभाकर गिराणेला 2 वर्ष कारावासाची शिक्षा तसेच 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top