दिनांक 21 October 2019 वेळ 3:38 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » अंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी

अंगावर वीज कोसळल्याने 35 वर्षीय इसम जखमी

प्रतिनिधी/वाडा, दि. 19 : काल, बुधवारी रात्री विजांच्या कडकडाटांसह कोसळलेल्या मुसळधार पावसादरम्यान अंगावर वीज पडून तालुक्यातील बुधावली येथील एक जण जखमी झाला आहे. पिंट्या वाळकू शेलार (वय 35) असे सदर इसमाचे नाव आहे. काल रात्री जोरदार पाऊस व विजा कडकडत असताना पिंट्या शेलार घराबाहेर पडला व त्याचवेळी त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने तो जखमी झाला. यानंतर त्याला वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top