दिनांक 25 May 2020 वेळ 12:53 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » चोरटी रेती वाहतुक, दोघांना अटक; डहाणू पोलिसांची कारवाई

चोरटी रेती वाहतुक, दोघांना अटक; डहाणू पोलिसांची कारवाई

संग्रहित छायाचित्र

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 18 : समुद्रातून बेकायदेशीररित्या रेतीचा उपसा करुन चोरटी वाहतूक करणार्‍या दोन जणांविरोधात डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन रेतीची वाहतूक करण्यासाठी वापरला गेलेला पिकअप टेम्पो व त्यातील 5 हजार रुपयांची रेती जप्त करण्यात आली आहे. सरावली कोस्टल चेक पोस्ट येथे काल, मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असुन अविनाश भिमा वरखंड (वय 19) व यज्ञेश प्रशांत मेस्त्री असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. एम.एच. 04/ई.वाय. 0146 या क्रमांकाच्या पिकअपमध्ये सिमेंटच्या प्लास्टीकच्या गोणीत भरलेली रेती घेऊन हे दोघे अज्ञात स्थळी निघाले होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top