राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्षपदी नगरसेवक तन्मय शशिकांत बारी

0
6

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 9 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डहाणू शहराध्यक्षपदी नगरसेवक तन्मय शशिकांत बारी यांची निवड करण्यात आली आहे. नगरसेवक व शहराध्यक्ष शमी पिरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर तन्मय यांची निवड करण्यात आली.

डहाणू तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक भाजपमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्ष सुनील भूसारा यांनी डहाणूत येऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तडकाफडकी निवड जाहीर केली. यावेळी माजी तालुका अध्यक्ष राजेश पारेख, जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते काशिनाथ चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश कर्णावट, विक्रमगड नगरपंचायतीचे नगरसेवक प्रमोद कोठेकर उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments