दिनांक 03 July 2020 वेळ 3:16 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » सातपाटी बंदरातील गाळ काढण्यासाठी 25 लाखांची तरतूद

सातपाटी बंदरातील गाळ काढण्यासाठी 25 लाखांची तरतूद

खासदार गावित व जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी

वार्ताहर/बोईसर, दि. 6 : पालघर तालुक्यातील सातपाटी बंदरातील गाळ काढण्यासाठी खासदार राजेंद्र गावित आणि जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आज एकत्रित पाहणी करून खासदार राजेंद्र गावित यांनी आपल्या खासदार निधीतून गाळ काढण्यासाठी 25 लाखांची तत्काळ तरतूद केली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासुन सातपाटी बंदरात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे येथील मच्छिमार बांधवांना आपल्या बोटी बंदरात ने-आण करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. ही बाब लक्षात घेता खासदार गावित व जिल्हाधिाकरी डॉ. शिंदे यांनी आज बंदर परिसरात पाहणी करुन साचलेला गाळ काढण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यात आला. याकामी खासदार गावित यांनी त्यांच्या खासदार निधीतून 25 लाख रुपयांची तरतूद जाहीर केली. त्यामुळे लवकरच सातपाटी बंदर गाळमुक्त होणार आहे.

दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीतील मार्ग म्हणून तारापुर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सीएसआर विकास निधीतून मुरबे-सातपाटी बंदरांना जोडणारा पूल बांधण्याबाबतही यावेळी पाहणी करण्यात आली. तसेच सातपाटी बंधारा, मासळी मार्केट यार्ड, भुयारी विद्युत वितरण तसेच मच्छिमार भगिनींसाठी पालघर येथे मासळी मार्केट आदी विविध विषयांवरही यावेळी चर्चा झाली.

अणुऊर्जा प्रकल्पाचे साईड डायरेक्टर ए. के. राजपूत, पालघर प्रांत विकास गजरे, मच्छिमार सोसायटीचे चेअरमन राजन मेहेर, पंचायत समिती सदस्य मुकेश मेहेर तसेच शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top