दिनांक 03 July 2020 वेळ 3:28 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » जिल्ह्यातील शिक्षकांना वेतन वाढ व वरिष्ठ श्रेणी विनाअट लागू करावी! -खा. राजेंद्र गावित

जिल्ह्यातील शिक्षकांना वेतन वाढ व वरिष्ठ श्रेणी विनाअट लागू करावी! -खा. राजेंद्र गावित

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : शिक्षक हे समाजातील आदर्श मानले जातात. सामाजिक दायित्व, सामाजिक मूल्ये जपण्याचं काम शिक्षकांकडे आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी विना अट लागू करावी, असे सांगतानाच इतर जिल्ह्यात मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांची पदोन्नती झालेली आहे. पालघरमध्ये मात्र ही पदोन्नती अद्याप झाली नसून यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन खा. राजेंद्र गावित यांनी आज शिक्षक दिनी पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना दिले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आज जिल्हा आदर्श शिक्षण पुरस्कार प्रदान सोहळा 2019 पालघर येथील आनंदाश्रम इंग्लिश स्कुल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी खा. गावित बोलत होते. यावेळी प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण आठ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सोहळ्यास महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती निलेश गंधे महिला व बालकल्याण समिती सभापती धनश्री चौधरी, समाज कल्याण सभापती दर्शना दुमाडा, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, पंचायत समिती सभापती मनीषा पिंपळे, जिल्हा परिषद सदस्य चित्रा किणी, शिक्षणाधिकारी (माध्य.) जयवंत खोत, शिक्षणाधिकारी (प्राथ.) लता सानप व इतर मान्यवर उपस्थित होते.

कुंदबाला पाटील (वसई), भगवान शिद (मोखाडा), सुहास सुतार (तलासरी), विलास भुरभूरे (विक्रमगड), मधुकर भोये (जव्हार), सुरेश भोये (डहाणू), रोशनी भोईर (वाडा), स्वेजल म्हात्रे (पालघर) या आठ शिक्षकांना यावेळी रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मानवस्त्र देऊन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top