दिनांक 03 July 2020 वेळ 3:18 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » परतीच्या पावसाचा फटका, पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत

परतीच्या पावसाचा फटका, पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत

डहाणू ते विरारदरम्यान अनेक गाड्यांचा खोळंबा

डहाणू रेल्वे स्थानक

प्रतिनिधी/डहाणू, दि. 4 : गेल्या दोन दिवसांपासून बरसणार्‍या परतीच्या पावसाने मुंबई व पालघर जिल्ह्यासह पश्चिम किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबईसह उपनगरातील भाग जलमय झालाने त्याचा विपरीत परिणाम पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या व लोकल सेवेवर झाला असून डहाणू रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणार्‍या व मुंबईकडून येणार्‍या सर्व गाड्या अनिश्चित काळापर्यंत उशीराने धावत आहेत. तर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करुन विविध रेल्वेस्थानकांवर थांबवण्यात आल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. जिल्ह्यातील काही भागात रस्त्यांवर पाणी साठल्याने रस्ते वाहतूकीवरही पावसाचा परिणाम दिसत होता.

डहाणू रेल्वे स्थानक

दरम्यान, सार्वजनिक गणेश मंडळे, फुल विक्रेते, दुकानदार यांनाही पावसाचा फटका बसला असुन मंडपामध्ये कुठूनही पावसाचे पाणी येऊ नये म्हणून कार्यकर्ते काळजी घेताना दिसत होते. तर पावसामुळे दर्शनासाठी घराबाहेर न पडलेल्या भाविकांमुळे मंडप ओस पडले आहेत. एकंदरीत भाववाढीमुळे बाजारात असलेले मंदीचे सावट आणि ऐन उत्सवाच्या काळात कोसळणारा पाऊस यामुळे दुष्काळात तेरावा महिना असे म्हणण्याची वेळ व्यापार्‍यांवर आली आहे. पावसामुळे फुले भिजल्याने फुल विक्रेत्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. उत्सवाच्या काळात दोन पैसे मिळण्याची संधी पावसामुळे हुकल्याची निराशा त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होती.

मध्य रेल्वे ठप्प
सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील ठाणे-मुंबई सीएसएमटी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा दरम्यानची वाहतूक सुरू आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
रायगडमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

रायगडमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून, कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुण्यातून एनडीआरएफचे दोन पथक पनवेलमध्ये दाखल झाले आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top