दिनांक 03 July 2020 वेळ 4:42 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » 1 सप्टेंबरपासुन जिल्ह्यात नविन वाहतुक नियम लागू

1 सप्टेंबरपासुन जिल्ह्यात नविन वाहतुक नियम लागू

दंडाच्या रक्कमेत कित्येक पटीने वाढ

पालघर, दि. 3 : रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. अपघातांमध्ये दगावणार्‍यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक प्रमाणात आहे. हे लक्षात घेत वाहनधारकांवर वचक बसण्यासाठी वाहतुक नियम अधिक कठीण करुन वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जुन्या वाहतुक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गेल्या लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधयाकाला मंजुरी मिळाल्यानंतर 1 सप्टेंबर 2019 पासुन वाहतुक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना अधिक दंड भरावा लागणार असुन पालघर जिल्ह्यातही हे नवे नियम 1 सप्टेंबरपासुन लागू झाले आहेत.

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार आता वाहतुकीचा कोणताही नियम भंग केला तर किमान दंड 500 तर कमाल दंड 25 हजार रुपये आणि तीन वर्षे तुरुंगवास इतका आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांनी नियम तोडले तर त्याची शिक्षा पालक आणि वाहन मालकांना भोगावी लागणार आहे.

नियमभंग केल्यास वाहनचालकांना आता खालीलप्रमाणे दंड भरावा लागेल :
* रस्ते नियमांचा भंग – 500 रुपये
* प्रशासनाचा आदेश भंग -2 हजार रुपये
* परवाना नसलेले वाहन चालविणे – 5 हजार रुपये
* पात्र नसतांना वाहन चालविणे – 10 हजार रुपये
* वेगमर्यादा तोडणे – 2 हजार रुपये
* धोकादायक वाहन चालविणे – 5 हजार रुपये
* दारु पिऊन वाहन चालविणे – 10 हजार रुपये
* वेगवान वाहन चालविणे – 5 हजार रुपये
* विनापरवाना वाहन चालविणे – 10 हजार रुपये
* सिटबेल्ट नसणे – 1 हजार रुपये
* दुचाकीवर दोन पेक्षा जास्त व्यक्ती – 2 हजार रुपये
* अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या महत्वाच्या वाहनांना रस्ता न देणे – 10 हजार रुपये
* विमा नसतांना वाहन चालविणे – 2 हजार रुपये
* अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा – मालक-पालक दोषी 25 हजार रुपये व 3 वर्ष तुरुंगवास
* विना हेल्मेट – 1 हजार रुपये व 3 महिने वाहतुक परवाना रद्द

दरम्यान, पालघर पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांनी जिल्ह्यातील नागरिकांना नव्या वाहतुक नियमांचे काटकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top