दिनांक 03 July 2020 वेळ 3:09 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » गणेशोत्सवासाठी पालघर जिल्हा पोलीस सज्ज!

गणेशोत्सवासाठी पालघर जिल्हा पोलीस सज्ज!

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 1 : उद्या, 2 सप्टेंबरपासुन सुरु होणार्‍या गणेशोत्सवासाठी पालघर जिल्हा पोलीस सज्ज असुन हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी ठोस पावले उचलण्यात आलेली आहेत, अशी माहिती पालघर पोलीस दलातर्फे देण्यात आली आहे.

जिल्ह्यात जवळपास 2 हजार 719 ठिकाणी सार्वजनिक व 40 हजार 525 ठिकाणी खाजगी गणपती मुर्तीची स्थापना होणार असुन 212 ठिकाणी सार्वजनिक व 3 हजार 148 ठिकाणी खाजगी गौरी स्थापना होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील 2 अपर पोलीस अधीक्षक, 7 उपविभागीय पोलीस अधिकारी, 1 हजार 911 पोलीस अधिकारी, 1 हजार 394 पोलीस कर्मचारी तसेच 1 एसआरपीएफ कंपनी, आरसीपी व क्युआरटीचे 6 पथक व 500 होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी व उपविभागिय अधिकार्‍यांची बैठक घेऊन योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.

कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये राखीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर लाठी, हेल्मेट, ढाल, अश्रुधुर आदी साधनांसह प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍यांना 24 तास तयार ठेवण्यात आलेले आहे. ते कोणतीही परिस्थिती हाताळण्यास 24 तास सज्ज असतील. प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर दंगा काबु योजना राबविण्यात येत असुन गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत कॉर्नर मिंटीग व पायी गस्त प्रभावीपणे करण्यात येत आहे. अवैध दारु, अंमली पदार्थ व जुगार धंदे आदीचे ऊच्चाटन करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस ठाणे स्तरावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच अवैद्य धंदे करणारे आदींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत असुन त्यांच्या हालचालीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत आहे. पोलीस मुख्यालयात जलद प्रतिसाद पथक व दंगल नियंत्रण पथक ठेवण्यात आलेले आहे, अशी माहिती देतानाच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी पालघर पोलीस 24 तास सतर्क आणि सज्ज असुन आपणास कोणताही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या 8669604100, 9730711119 किंवा 9730811119 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पालघर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top