दिनांक 21 February 2020 वेळ 11:47 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसईत दोन गावठी कट्टे व काडतुसासह एकाला अटक

वसईत दोन गावठी कट्टे व काडतुसासह एकाला अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 21 : स्कुटीच्या डिक्कीतून बेकायदेशीररित्या गावठी कट्ट्यांची वाहतूक करणार्‍या 29 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व एक काडतुस जप्त केले आहे. पवन राजेंद्र चौबे असे सदर तरुणाचे नाव आहे.

वालीव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल, 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 ते पावणे दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मुळचा उत्तर प्रदेशातील बर्धा येथील रहिवासी असलेला व सध्या नालासोपारा पुर्वेला राहणारा पवन चौबे आपल्या एम.एच.48/ए.एन. 2651 या क्रमांकाच्या होंडा अ‍ॅक्टीव्हा स्कुटीच्या डिक्कीत दोन गावठी कट्टे व एक काडतूस घेऊन अज्ञात ठिकाणी निघाला होता. मात्र वालीव पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेत सदर शस्त्र जप्त केली. दरम्यान, बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्याचे कलम 3 व 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 व 135 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन वालीव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top