दिनांक 21 September 2019 वेळ 5:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » विरारमध्ये 6.8 किलो गांजा पकडला

विरारमध्ये 6.8 किलो गांजा पकडला

संग्रहित छायाचित्र

राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 20 : येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या भालीवली गावाच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने 81 हजार 600 रुपये किंमतीचा 6 किलो 800 ग्रॅम वजनी गांजा व 56 हजार 860 रुपयांची रोख रक्कम असा एकुण 1 लाख 38 हजार 640 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल, सोमवारी दुपारी 3.40 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुलाब दत्तु बागडे (वय 57, रा. भालीवली) या इसमाला अटक करण्यात आली असुन त्याच्याविरोधात अंमली पदार्थ औषधे आणि मनोवैज्ञानिक पदार्थ अधिनियम 1985 चे (एन.डी.पी.एस.अ‍ॅक्ट) कलम 8 (क) व 22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, काल संंध्याकाळी वालीव पोलिसांनी नायगाव पुर्व भागातून 2 हजार रुपये किंमतीचा 160 ग्रॅम वजनी गांजा जप्त केला असुन याप्रकरणी सुर्यकांत टोपाजी ओगले या आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात वालीव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top