दिनांक 21 February 2020 वेळ 12:04 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू दिवाणी न्यायालयातर्फे वृक्षारोपण

डहाणू दिवाणी न्यायालयातर्फे वृक्षारोपण

न्यायालय परिसरात विविध 45 वृक्षांची केली लागवड

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 20 : डहाणू दिवाणी न्यायालयाच्या वतीने आज, मंगळवारी न्यायालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे यांच्या आदेशान्वये व डहाणू न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश सौ. ए. बी. पाटील यांच्या अध्यक्षेखाली हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. न्यायालयातील वरिष्ठ लिपीक चेतन द. मोगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रमाबाबतची माहिती देऊन वृक्ष लागवडीचे फायदे तसेच वृक्षांचे जतन करण्यासंदर्भात थोडक्यात माहिती सांगितली. यानंतर न्यायाधीश, वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, पोलीस कर्मचारी वर्ग अशा सर्वांनी मिळून न्यायालयीन इतारतीच्या
परिसरात एकूण 45 वेगवेगळी प्रकाराची झाडे लागवड केली.

याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश सौ. ए. बी. पाटील, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्री. ओ. जे. कुलकर्णी तसेच तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष श्री. व्ही. के. चोरडीया, सचिव श्री. शेखर एस. जोशी, सहा. सरकारी अभियोक्ता श्री. वळवी व इतर वकील मंडळी, न्यायालयीन कर्मचारी श्रीमती जयश्री डी. घीवाला, श्री. भुसारे, श्री. परब, श्री. रविंद्र. डी. मोहने, श्री. शशीकांत बी. गोरे, श्री. राहुल यु. कुलकर्णी, श्री. परदेशी, श्री. चौधरी व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

डहाणू वन विभाग व डहाणू पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अजय सांळुखे यांनी या वृक्षलागवडीसाठी झाडे पुरविली.

comments

About Rajtantra

Scroll To Top