दिनांक 21 September 2019 वेळ 5:54 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दांडेकर महाविद्यालयात य.च.म.मु. विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन

दांडेकर महाविद्यालयात य.च.म.मु. विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन

पालघर, दि. 19 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (य.च.म.मु.) पालघर जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्राच्या विद्यार्थ्यांकरिता येत्या शुक्रवारी (दि. 23) पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. दांडेकर महाविद्यालयाच्या तेवारी रंगमंच सभागृहात सकाळी 11.10 वाजता हा पदवी प्रदान कार्यक्रम सुरु होणार असुन जानेवारी व मे-2018 च्या परीक्षेत पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या समारंभात य.च.म.मु. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव होणार असून या कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. जी. डी. तिवारी समारंभाच्या अध्यक्ष स्थानी असतील. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य व केंद्रप्रमुख डॉ. किरण सावे, केंद्र संयोजक प्रा. विवेक पुराणिक, डॉ. बी.बी. रहाणे व सो.दा.शि. मंडळीच्या य.च.म.मु.वि. च्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष सुरेश जोशी हे उपस्थित राहणार असून वरील परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top