दिनांक 17 January 2020 वेळ 10:10 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; एकाला अटक

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; एकाला अटक

  • मुख्य आरोपी फरार
  • अपहरणासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

वाडा/प्रतिनिधी : तालुक्यातील हरोसाळे येथे राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरात घुसून बळजबरीने पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी फरार झाला आहे. बुधवारी (दि. 17) ही घटना घडली असुन या प्रकाराने गावात खळबळ उडाली आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील डाहे येथे राहणार्‍या विनोद कोंब या विवाहित तरुणाचे शेजारील हरोसाळे गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या एकतर्फी प्रेमातून लग्न करण्याच्या उद्देशाने त्याने बुधवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास पीडित मुलीचे घर गाठत व ती घरात एकटीच असल्याचा फायदा घेत तिचे अपहरण केले व काही तास तिला स्वत:च्या घरात डांबून ठेवले. यानंतर रात्री 10 वाजेच्या सुमारास तिला तिथून अन्य ठिकाणी नेण्यासाठी त्याने आपला मित्र मधुकर मुकणे याची मदत घेतली. पुढे तिघेही मधुकर मुकणेच्या दुचाकीवरुन अज्ञात स्थळी निघाले असताना घाईगडबडीत रस्त्यात दुचाकी घसरुन तिघेही रस्त्यावर पडले. या संधीचा फायदा घेत मुलीने आरडाओरड केल्यानंतर गावातील लोक तेथे जमा झाली व मधुकर मुकणेला त्यांनी पकडले. तर विनोद कोंब अंधाराचा फायदा घेत जंगलात फरार झाला. गावकर्‍यांनी पोलिसांना हा प्रकार कळवत मधुकर मुकणेला त्यांच्या ताब्यात दिले. तर पोलिसांनी कायदेशिर सोपस्कार पुर्ण करुन पीडित मुलीला सुखरुप तिच्या पालकांकडे सोपवले.

दरम्यान, विनोद कोंब व मधुकर मुकणे यांच्याविरोधात अपहरणाप्रकरणी भारतीय दंड विधान संहितेचे कलम 363, 452, 432 या कलमांन्वये तसेच या अपहरणादरम्यान पीडित मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असुन पोलीस उपनिरीक्षक अलका करडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top