दिनांक 25 August 2019 वेळ 2:32 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसईत तब्बल दिड कोटींचे अमली पदार्थ जप्त!

वसईत तब्बल दिड कोटींचे अमली पदार्थ जप्त!

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 19 : तीन दिवसांपुर्वीच डहाणू येथून 10 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करणार्‍या पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज, शुक्रवारी वसई येथून तब्बल दिड कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यात 69 किलो ग्रॅम अफूच्या झाडाच्या बोंडाचा चुरा व 1 हजार 240 ग्राम अफिमचा समावेश आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईत परराज्यातून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ आणले जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरुन नायगाव पुर्वेतील डॉन बॉस्को शाळेच्या मागे असलेल्या रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आर.जे.21/यु.बी. 0847 या क्रमांकाच्या स्कार्पियो गाडीला अडवून तपासणी केली असता या गाडीत 1 कोटी 38 लाख रुपये किंमतीचा 69 किलो ग्रॅम वजनी अफूच्या झाडाच्या बोंडाचा चुरा, 6 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 1 हजार 240 ग्राम वजनी अफिम व साडे चार लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली.

यानंतर पोलिसांनी गाडी व अमली पदार्थ जप्त करत सोनाराम रामकिशन बिष्णोई (वय 33) व भजनलाल मालाराम बिष्णोई (वय 22, दोघे रा. राजस्थान) अशा दोघांना अटक केली असुन त्यांच्याविरोधात वालीव पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8(क), 22, 27, 29 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top