दिनांक 17 January 2020 वेळ 9:15 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मुंबई-अहमदाबाद महामार्गावर माशांनी भरलेली पिकअप उलटली

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर माशांनी भरलेली पिकअप उलटली

वार्ताहर/बोईसर, दि. 19 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज, शुक्रवारी माशांनी भरलेला एक पिकअप टेम्पो उलटून अपघात झाला. यावेळी रस्त्याच्या मधोमध शेकडो मासे तडफडत असल्याचे पाहून बघ्यांनी एकच गर्दी केली. या अपघातात पिकअपचा चालक किरकोळ जखमी झाला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस जवळील पाडोस पाडा येथे हा अपघात घडला. अपघातग्रस्त पिकअपमधुन सूर्या धरणातून पकडण्यात आलेले रहू व कटला प्रजातीचे मासे विक्रीकरिता मुंबईच्या दिशेने नेले जात होते. पिकअपमध्ये पाण्याच्या टाकीत भरुन या माशांची वाहतूक केली जात होती. मात्र सदर टाकी पाण्याने अर्धीच भरली असल्याने वळणवर त्यातले पाणी अस्थिर झाले व यामुळे पिकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून पिअकप उलटली. या अपघातानंतर रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या टाकीतील सुमारे 200 ते 300 किलो मासे रस्त्यावर तडफडत होते. हे पाहून आजूबाजूला शेती करत असलेले शेतकरी तसेच महामार्गावरील गाड्या थांबून बघ्यांनी एकच गर्दी केली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ मंदावली होती.

दरम्यान, या अपघातात पिकअप जीपचा चालक किरकोळ जखमी झाला आहे.

(टीप – तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर बातमीच्या शेवटी दिसणार्‍या Whatsapp च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही ही बातमी सहज शेअर करू शकता. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा.)

आमचा ई-पेपर वाचण्यासाठी epaper.rajtantra.com ला भेट द्या. खाली दिसणार्‍या facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन आमचे फेसबुक पेज लाईक करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top