दिनांक 24 February 2020 वेळ 7:55 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यातील लोकअदालतीत 145 खटले निकाली

वाड्यातील लोकअदालतीत 145 खटले निकाली

प्रतिनिधी/वाडा, दि. 14 : वाडा दिवाणी न्यायालयाच्या वतीने काल, शनिवारी वाडा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. या लोकअदालतमध्ये आप-आपसात समजोता होऊन 145 खटले निकाली काढण्यात आले. तर बँक कर्ज थकबाकीदार, वीज वितरण कंपनी थकीत बिल व ग्रामपंचायतीचे कर थकबाकीदार यांच्याकडून एकुण 55 लाख 58 हजार 984 रुपयांची थकबाकी या लोकआदलतच्या माध्यमातून वसूल करण्यात आली.

या लोक आदालतमध्ये दखलपुर्व प्रकरणे तसेच दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामधील तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या एकुण 11 पक्षकारांकडून 1 लाख 96 हजार 24 रुपयांची विविधरुपी थकबाकी व वीज वितरण कंपनीच्या 55 पक्षकारांकडूूून 3 लाख 32 हजार 23 रुपये वसूल करून खटले निकाली काढण्यात आले. तर तालुक्यातील विविध बँकांमधील 79 पक्षकारांकडून 50 लाख 30 हजार 937 रुपयांची थकबाकी वसूल होऊन खटले निकालात काढण्यात आले.

फौजदारी व दिवाणी प्रकरणातील 13 खटल्यांपैैकी 12 फौजदारी खटल्यातूून 11 हजार रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश एम.डी. सैंंदाने यांनी दिली. या लोकअदालतमध्ये वाडा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सुचिता कथडे, कनिष्ठ लिपिक एस. व्ही. चिंचोळीकर तसेच वकिल संतोष डेंगाणे, आर.जे. भोईर, प्रमोद भोईर, राजेश भोईर, चंद्रकांत पाटील, तानाजी अधिकारी आदींनी विशेष सहकार्य केले.

डहाणू येथील लोकन्यायालयात 185 प्रकरण निकाली

प्रतिनिधी/डहाणू, दि. 14 : येथील दिवाणी न्यायालयात काल, 13 जुलै रोजी दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयाच्या माध्यमातून 185 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या वेळी डहाणू तलासरी वकील संघटनेचे अध्यक्ष व्ही. के. चोरडीया, सचिव एस. एस. जोशी आणि इतर सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि सरस्वती पुजनाने लोकन्यायालयाच्या कामकाजाची सुरवात झाली. प्रारंभी डहाणू न्यायालयातील वरिष्ठ लिपिक श्री. सी. डी. मोगरे यांनी लोकन्यायालयाच्या समोर ठेवण्यात आलेल्या विविध प्रकरणांची सविस्तर माहिती दिली.

एका पॅनेलसमोर या लोकन्यायालयाचे कामकाज घेण्यात आले. यात डहाणू न्यायालयात विविध कलमान्वये दाखल असलेली 158 फौजदारी व 87 दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली होती. ज्यापैकी 5 फौजदारी व 1 दिवाणी प्रकरण निकाली निघाले. तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची अशी 691 प्रकरणे ठेवण्यात आली होती. ज्यामधील डहाणू पंचायत समितीच्या तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या पाणीपट्टी वसूलीच्या 488 प्रकरणांपैकी 156 प्रकरणे निकाली निघून 1 लाख 41 हजार 196 रुपयांची वसूली झाली. तर डहाणूतील विविध बँकांच्या रक्कम वसुलीच्या 203 प्रकरणांपैकी 23 प्रकरणे निकाली निघून 17 लाख 14 हजार 207 रुपयांची वसुली झाली.

या लोक न्यायालयाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी न्यायालयातील कर्मचारी सी. डी. मोगरे, एस. बी. गोरे व आर. यु. कुलकर्णी यांनी विशेष मेहनत घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top