दिनांक 24 February 2020 वेळ 6:56 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » शेजार्‍यानेच चोरी केले अडीच लाखांचे दागिने

शेजार्‍यानेच चोरी केले अडीच लाखांचे दागिने

आरोपीला अटक, हस्तगत दागिने संबंधित महिलेला सुपूर्द

प्रतिनिधी/वाडा, दि.14 : वाड्यातील कुंभारआळी येथील एका घरात अज्ञात चोरट्याने चोरी करत अडीच लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी वाडा पोलिसांनी सदर चोरट्याला अटक करत त्याच्याकडून चोरीला गेलेले दागिने हस्तगत करुन ते संबंधित महिलेला सुपूर्द केले आहेत. विशेष म्हणजे शेजारी राहणार्‍या इसमाकडूनच ही चोरी करण्यात आली होती.

कुंभार आळीत राहणार्‍या राधाबाई गणपत पाटील यांच्या घरातील कपाटातून एक सोन्याची चेन, एक ब्रेसलेट व दोन अंगठ्या असे अंदाजे दोन लाख 50 हजार रुपये किंमतीचे दागिनेे काही दिवसांपुर्वी चोरीला गेले होते. वाडा पोलिसांनी शिताफीने या चोरीचा तपास करून पाटील यांच्या घराशेजारीच राहणार्‍या गुलाब पाटील याला याप्रकरणी अटक केली. यावेळी त्याची कसुन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. यानंतर त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आले असुन ते राधाबाई पाटील यांना सुपूर्द करण्यात आले आहेत. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी ही माहिती दिली.

वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या हस्ते हे सोने राधाबाई यांना सोने सुपूर्द करण्यात आले. यावेळी भावुक झालेल्या राधाबाई यांनी वाडा पोलिसांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबणावळ, पोलीस हवालदार निल नागेश व इतर कर्मचारी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top