दिनांक 24 February 2020 वेळ 8:00 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » काळ्या काचांच्या वाहनांवर वाडा पोलिसांची कारवाई

काळ्या काचांच्या वाहनांवर वाडा पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी/वाडा, दि.12 : काचांना काळ्या रंगाच्या फिल्म्स लावून काचा झाकून ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या चारचाकी वाहनचालकांवर वाडा पोलिसांनी धडक कारवाई करत जवळपास 35 हुन जास्त वाहन चालकांकडून दंड वसूल केला आहे. शुक्रवारी दुपारी खंडेश्वरी नाका येथे ही कारवाई करण्यात आली.

काचा पारदर्शक असाव्यात, असा नियम असताना अत्यंत दाट काळ्या रंगाच्या काचा बसवून किंवा काचांवर फिल्म चिकटवून गाड्या अपारदर्शक करण्याचा प्रयत्न काही वाहनचालकांकडून केला जातो. पोलीस महासंचालकांच्या आदेशावरून राज्यभरात अशा वाहनचालकांविरोधात कारवाईची ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार वाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबणावळ, सुशील भोसले, गोंजारी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल पी.एन. रासम, पी.सी.घाडगे व पी.एन.भुसार यांनी ही कारवाई केली.

लवकरच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही पोलिस सूत्रांकडून मिळाले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top