तलासरीतील वडवली येथे भूकंपाच्या धक्क्याने घराचे नुकसान

0
16

प्रतिनिधी /तलासरी, दि. 11 : डहाणू व तलासरी तालुक्यातील काही भागांमध्ये मागील वर्षभरापासुन वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. आज तलासरी तालुक्यातील वडवली डोंगरीपाडा येथे दुपारी 2 वाजून 4 मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का बसला. या धक्क्यामुळे येथील जयराम लहानू घुटे यांच्या घराचे मधले मुख्य बहाल तुटून नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र अशा वारंवार बसणार्‍या भूकंपाच्या धक्क्यांनी तालुक्यातील कुर्झे धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्याने घुटे यांच्या घराचे नुकसान झाल्याची नोंद वडवली ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments