दिनांक 21 October 2019 वेळ 3:36 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात सर्पदंशाने सहा वर्षीय मुलाचा मृत्यू

वाड्यात सर्पदंशाने सहा वर्षीय मुलाचा मृत्यू

प्रतिनिधी/वाडा, दि. ११ : तालुक्यातील दहिवली या गावातील विनेेश लक्ष्मण बात्रा या सहा वर्षीय मुलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

विनेश हा बुधवारी रात्री आपल्या घरात कुटुंबियांसोबत झोपला असता पहाटे तीन साडे तीनच्या सुमारास मण्यार जातीच्या सर्पाने विनेशच्या हात व कानाला दंश केला. सर्पदंश झाल्याचे विनेशच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच विनेशला वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु विनेश प्रकृती अधिक गंभीर बनत चालल्याने त्याला अधिक उपचारासाठी ठाणे येथील सिव्हल हस्पिटल येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे मागील वर्षी याच घरात विणेशच्या पाच वर्षीय चुलत बहिणीचाही सर्पदंशाने मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top