दिनांक 21 October 2019 वेळ 2:38 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » नोकरी करण्यापेक्षा, नोकरी देणारे बना! -जिल्हाधिकारी

नोकरी करण्यापेक्षा, नोकरी देणारे बना! -जिल्हाधिकारी

वाडा येथे रोजगार मेळावा संपन्न

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : स्वयंरोजगारामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहता येतं. स्वतःच्या आवडीचा उद्योग व्यवसाय करून इतरांना नोकरी देता येते. म्हणूनच ज्यांना नोकरी मिळेल त्यांनी नोकरी करा, मात्र ज्यांना नोकरी मिळणार नाही त्यांनी योग्य ते प्रशिक्षण व बँकांची मदत घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करावा. शासन तुम्हाला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे, असे प्रतिपादन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी वाडा येथे केले.

वाडा तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल कॉलेजमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास केंद्रातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आज, बुधवारी झालेल्या या मेळाव्यामध्ये पालघर जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी ’मशाल’चे संपादक शरद पाटील, आयडियल कॉलेजचे सेक्रेटरी अभिषेक जैन व जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे मुकेश संखे यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्यामध्ये पालघर जिल्ह्यातील शेकडो युवक – युवती सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमामध्ये शासनाच्या विविध योजनांविषयी व स्वयंरोजगाराविषयी तज्ञांनी मार्गदर्शन केले. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या व आयडियल कॉलेजच्या कर्मचार्‍यांनी विशेष मेहनत घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top