दिनांक 21 October 2019 वेळ 2:40 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » 80 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी कोसळली

80 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी कोसळली

  • माहीम हरणवाडी येथील घटना
  • सुदैवाने तीन जण बचावले

वार्ताहर/बोईसर, दि. 10 : पालघर तालुक्यातील माहीम हरणवाडी येथील पाच वर्षांपुर्वीच बांधण्यात आलेली 80 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी काल, मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. या दुर्घटनेदरम्यान, टाकीजवळच उभे असलेले तीन जण थोडक्यात बचावल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र ऐन पावसाळ्यात गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, निकृष्ट दर्जाच्या टाकीच्या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

पालघरमधील 26 गावांसाठी पाणीपुरवठा करणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत हरणवाडी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सन 2012-2013 साली येथे 80 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. या टाकीला ग्रामपंचायतीच्या फंडातून काही निधी खर्च करून पाणीपुरवठा सुरू होता. काल नियमितपणे टाकीतून पाणीपुरवठा सुरू असतानाच अचानक रात्री दहाच्या सुमारास टाकी कोसळली. या दुर्घटनेत जवळच उभे असलेले तीन जण आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत.

या टाकीचे बांधकाम 5 वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. त्यामुळे निकृष्ट बांधकामामुळेच ही टाकी कोसळल्याने या याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top