दिनांक 23 July 2019 वेळ 4:43 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसईत सराईत दुचाकी चोरटे जेरबंद; 11 दुचाकी हस्तगत

वसईत सराईत दुचाकी चोरटे जेरबंद; 11 दुचाकी हस्तगत

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 10 : पालघर व ठाणे जिल्ह्यासह मुंबईतील विविध पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत दुचाकी चोरट्यांना गजाआड करण्यात वालीव पोलीसांना यश आले असुन त्यांच्याकडून 11 दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

वसई तालुक्यातील वालीव पोलीस स्टेशमध्ये दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेने सागर रवी जाधव (वय 21, रा. भिवंडी, ठाणे) व वसंत रविपुजारी कोटीयान (वय 22, रा. वसई) अशा दोघांना अटक करुन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दोघांनी वसई तालुक्यातून 7 तर भिवंडी व मुंबई शहरातून प्रत्येकी दोन अशा एकुण 11 दुचाकी चोरल्याचे आपल्या कबुलीत म्हटले. यानंतर पोलिसांनी विविध भागातून सदर दुचाकी जप्त केल्या असुन 4 लाख 29 हजार रुपये अशी हस्तगत करण्यात आलेल्या एकुण मुद्देमालाची किंमत आहे.

दरम्यान, या दोन्ही चोरट्यांविरोधात वालीव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 379 नुसार गुन्हा दाखल पोलीस असुन अधिक तपास करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top