दिनांक 20 February 2020 वेळ 9:49 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जव्हार : गरिबीमुळे आत्महत्या; पोरक्या झालेल्या मुलींच्या शिक्षणाची शासकीय आश्रमशाळेत सोय करणार! -विवेक पंडित

जव्हार : गरिबीमुळे आत्महत्या; पोरक्या झालेल्या मुलींच्या शिक्षणाची शासकीय आश्रमशाळेत सोय करणार! -विवेक पंडित

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 8 : जव्हार तालुक्यातील खरोंडा येथे शुक्रवारी रूक्शाना जीवल हांडवा या महिलेने दोन मुलींसह स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमागच्या कारणांचा पोलीस तपास करीत आहेत. या कुटुंबातील तीनही मुलींच्या शिक्षणाची सोय शासकीय आश्रमशाळेमध्ये करण्यात येईल, असे आदिवासी क्षेत्र विकास योजना आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेतली असून त्यांच्या निर्देशानुसार पंडित यांनी आज खरोंडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. लहान मुलीवर उपचार सुरू असलेल्या जव्हारच्या कुटीर रुग्णालयास देखील त्यांनी भेट देऊन तिच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबत आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यानंतर त्यांनी अधिकार्‍यांसमवेत चर्चा या करून घटनेचा आढावा घेतला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, तहसीलदार संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

पंडित यांनी रूक्शाना यांच्या घरी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, एक महिन्यांपूर्वी रूक्शाना यांच्या पतीने आत्महत्या केल्यामुळे नैराश्य येऊन ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांना सर्व बाजूंनी तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. दोन मुलींपैकी एक नऊ आणि एक सहा वर्षांची असून त्यांना शिक्षणासाठी जवळच्या देहरे येथील आश्रमशाळेत दाखल करण्याचे निर्देश प्रकल्प अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. तर लहान मुलगी 7-8 महिन्यांची असल्याने तिच्या नातेवाईकांच्या संमतीनंतर तिला शिक्षणाचे वय होईपर्यंत बालगृहात ठेवण्यात येईल, असे ते म्हणाले. मुख्यमत्र्यांनी वैयक्तिक पातळीवर तीनही मुलींच्या नावे त्या अठरा वर्षांच्या होईपर्यंत प्रत्येकी दोन लाख रुपये मुदतठेव ठेवण्याची सूचना केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top