वाडा : बांधकाम ढासळल्याने चालू ट्रान्सफार्मर कोसळले!

0
12

सुदैवाने अप्रिय घटना टळली

प्रतिनिधी/वाडा, दि. 8 : खंडेश्वरी नाका येथील मंगलमूर्ती अपार्टमेंट समोर विद्युत प्रवाह चालू असलेला ट्रान्सफार्मर दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. यावेळी सुदैवाने मोठा अपघात टळला असला तरी या प्रकाराने वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मंगलमूर्ती अपार्टमेंटसमोर काही वर्षांपुर्वी विद्युत ट्रान्सफार्मर ठेवण्यासाठी बांधकाम करण्यात आले असुन त्यावर सदर ट्रान्सफार्मर ठेवण्यात आला होता. मात्र हे बांधकाम अतिशय जुणे व जीर्ण झाले होते. विशेष म्हणजे महावितरणच्या कर्मचार्‍यांच्या ही बाब लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यातच सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर बांधकाम एका बाजूने ढासळले व त्यावरील ट्रान्सफार्मर कोसळला. हे ट्रान्सफार्म असलेल्या परिसरात अनेक दुकानांसह दुचाकी व चारचाकी वाहन दुरुस्तीची दुकाने असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. तसेच या ट्रान्सफार्मरच्या शेजारीच एक बॅटरी विक्रेत्याचे दुकान आहे. हा ट्रान्सफार्मर कोसळला तेव्हा विद्युत पुरवठा चालू असल्याने अचानक मोठा आवाज झाला व हा आवाज एकून सर्वांची पळापळ झाली. दुर्दैवाने जर या ट्रान्सफार्मरचा स्फोट झाला असता तर भयंकर घटना घडली असती.

दरम्यान, याबाबत महावितरणच्या वाडा कार्यालयाचे उप अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Print Friendly, PDF & Email

comments