दिनांक 26 May 2020 वेळ 5:57 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जव्हार : गरिबीने घेतला कुटूंबाचा बळी; पतीनंतर पत्नीने दोन मुलींना विष पाजुन केली आत्महत्या

जव्हार : गरिबीने घेतला कुटूंबाचा बळी; पतीनंतर पत्नीने दोन मुलींना विष पाजुन केली आत्महत्या

सुदैवाने 8 महिन्यांची चिमुकली बचावली

प्रतिनिधी/जव्हार, दि. 8 : शासनाकडून आदिवासींच्या उद्धारासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र या योजना खरच गरीब व गरजू आदिवासींपर्यंत पोहोचतात का? असा प्रश्‍न उपस्थित करणारी घटना जव्हार तालुक्यात घडली असुन गरिबीला कंटाळून आत्महत्या केलेल्या कुटूंबप्रमुखानंतर महिनाभरातच त्याच्या पत्नीने आपल्या दोन मुलींना विष पाजून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना येथे घडली आहे. यात सदर महिला व तिच्या तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने 8 महिन्याची चिमुकली बचावली आहे. तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तालुक्यातील खरोंडा येथील रुक्षाना हांडवा (वय 30) या महिलेच्या पतीने मागील महिन्यात गरिबीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कुटुंबातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी रुक्षाना हिच्यावर आली होती. अत्यंत गरिब व प्रतिकूल परिस्थिती त्यात हाताला रोजगार नसल्याने व उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने दोन मुलींचा सांभाळ करायचा कसा व त्यांना जगवायचे कसे असा प्रश्‍न रुक्षानाला पतीच्या आत्महत्येनंतर सतावत होता. याच विवंचनेतून 5 जुलै रोजी तिने अगोदर दोन्ही मुलींना विष पाजून व त्यानंतर स्वतः विष प्राशन केले. दरम्यान, हा प्रकार गावकर्‍यांचा लक्षात आल्यानंतर त्यांनी तिघांनाही तत्काळ येथील पतंगशहा कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत रुक्षाना व मोठी मुलगी दीपाली (वय 3) यांचा मत्यू झाला होता. तर 8 महिन्याची रुषाली यातून बचावली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत.

याबाबत मृत रुक्षणाची आई लक्ष्मी अमृत टोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जव्हार पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पोलीस अधिक तपास करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top