दिनांक 20 February 2020 वेळ 10:33 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » खेकडे पकडणे बेतले जीवावर; नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू

खेकडे पकडणे बेतले जीवावर; नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू

वाड्यातील दुर्दैवी घटना

प्रातिनिधीक छायाचित्र

प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : खेकडे पकडण्याचा छंद येथील एका तरुणाच्या जिवावर बेतला असुन खेकडे पकडण्यासाठी नाल्यात उतरताना तोल गेल्याने सागर हरिचंद्र भोईर या 26 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

गोऱ्हे ग्रामपंचायत हद्दीत राहणारा सागर भोईर हा तरुण काल, शनिवारी रात्रीच्या सुमारास खेकडे पकडण्यासाठी गावातील नाल्याकडे गेला होता. मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी गावकर्‍यांना नाल्यात त्याचा मृतदेह दिसून आला. गावकर्‍यांनी लागलीच पोलिसांना पाचारण केले असता, पोलिसांनी प्राथमिक तपास करून सागरचा खेकडे पकडण्याच्या नादात तोल जाऊन तो दगडावर पडल्याने यात त्याच्या तोंडाला जबर मार लागुन त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. असे असले तरी शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी सांगितले. वाडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top