दिनांक 20 February 2020 वेळ 10:24 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आदिवासी महिलांची पायपीट थांबणार, सुथेडपाडा व भेंडीपाडा येथे पाणी प्रकल्प कार्यान्वित

आदिवासी महिलांची पायपीट थांबणार, सुथेडपाडा व भेंडीपाडा येथे पाणी प्रकल्प कार्यान्वित

प्रतिनिधी/तलासरी, दि. 5 : दादरा नगर हवेली राज्याच्या सीमेलगत असलेल्या व तलासरी तालुक्यातील कोचाई-बोरमाळ या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या बोरमाळ येथील सुथेडपाडा आणि भेंडीपाडा या गावातील ग्रामीण व आदिवासी बांधवांसाठी आज पिण्याच्या पाण्याच्या दोन शाश्वत प्रकल्पांचे लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (एलटीपीसीटी) यांच्यातर्फे हस्तांतरण करण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकल्पांमुळे येथील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. एलटीपीसीटीची भागीदार असलेल्या ग्रामउर्जाच्या सहकार्याने हे पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प राबवण्यात आले व नंतर स्थानिक ग्रामपंचायतीला त्याचे हस्तांतरण करण्यात आले. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच एलटीपीसीटीचे विश्वस्त आणि स्थानिक गावकरी उपस्थित होते. या हस्तांतरण कार्यक्रमात तलासरी पंचायत समिती (ब्लॉक स्तरीय) आणि ग्रामपंचायत (गाव स्तरीय) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.

या प्रकल्पामध्ये नव्या बोअर वेल्स, सौर उर्जा पाण्याचे पंप, पाइपलाइन, स्टोअरेज टँक, पाणी वितरण पाइपलाइन आणि पाणी वितरण स्टँड यांचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण 10 स्टँड पोस्ट्स उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे आता एआरडीडब्ल्यूपी मापदंडानुसार गावातल्या प्रत्येक घरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुथेडपाडा आणि भेंडीपाडा या दोन गावांचा समावेश करण्यात आला आहे व यापुढे तालुक्यातील आणखी गावांना त्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत, पाण्याचा दर्जा, पाण्याची मागणी आणि पाण्यासाठी स्त्रियांना सहन करावा लागणारा त्रास आदी बाबी लक्षात घेऊन सुथेडपाडा आणि भेंडीपाड्यासाठी पिण्याच्या पाण्याची यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे.

याप्रसंगी बोलताना, सरकार आणि एल अँड टीमध्ये झालेले हे अशाप्रकारचे सहकार्य दुर्मीळ आहे. स्थानिक सरकार, पंचायतीशी सल्लामसलत करून शोधण्यात आलेल्या समस्या व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या उपाययोजना आणि तळागाळाशी असलेले संबंध या सर्व प्रकल्पांमध्ये दिसून येतात, असे मुख्य कार्यकारी अधिकारी बोरीकर म्हणाले.

comments

About Rajtantra

Scroll To Top