दिनांक 04 July 2020 वेळ 1:24 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » कार्यकर्त्याने समाजातील दुर्बल घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक -बाबाजी काठोळे

कार्यकर्त्याने समाजातील दुर्बल घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक -बाबाजी काठोळे

प्रतिनिधी/वाडा, दि. 30 : प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील सर्वात दुर्बल घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटले पाहिजे व त्यासाठी कार्यकर्त्याने या दुर्बल घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व पालघर लोकसभेचे विस्तारक बाबाजी काठोळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 30) वाडा येथील जिल्हा कार्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

पक्षाची ध्येयधोरणे, आपल्या सरकारच्या योजना या कोणत्याही सरकारी किंवा शासनपातळी शिवाय जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हेच कार्यकर्त्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे कार्यकर्ता घडतो, पर्यायी पक्ष उभा राहतो व जेव्हा समाज सबल होतो तेव्हा देशही त्यामुळे सक्षम होतो. म्हणून कार्यकर्त्याने सतत कार्यरत राहणे हे पक्षासाठी व समाजासाठी गरजेचे आहे, असे काठोळे म्हणाले.

भारतीय जनता पार्टी वाडा तालुका व शहर शाखेच्या वतीने बाबाजी काठोळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित भाजप तालुकाध्यक्ष संदीप पवार म्हणाले कि, काठोळे यांचे मार्गदर्शन आम्हा कार्यकर्त्यांना नेहमीच मोलाचे ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पदांवर काम करताना आम्हाला नक्कीच त्याचा उपयोग झाला व होत आहे. तर नगर पंचायतीचे गटनेते मनिष देहेरकर यांनी काठोळे हे जिल्ह्याच्या भाजपमधील भीष्माचार्य व प्रसंगी नीलकंठाची भूमिका पार पाडणारे जेष्ठ नेते असल्याचे सांगितले. अत्यंत मितभाषी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, संघटन कौशल्य, पक्ष हितासाठी वाईटपणा स्वतःकडे घेण्याची हातोटी, कार्यकर्ता ही एकच जात काठोळेंनी पाहिली असल्याचेही देहेरकर यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान वाड्याच्या नगराध्यक्षा गितांजली कोलेकर, पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. हेमंत सवरा, भाजपच्या आदिवासी विकास आघाडीचे राजू दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी भाजप, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top