दिनांक 09 April 2020 वेळ 2:36 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 17

Daily Archives: 17/03/2020

वसईत गावठी पिस्टलसह 2 जणांना अटक

2 जिवंत राऊंडही हस्तगत राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 17 : वसई पुर्वेतील सायली पेट्रोल पंपाजवळ संशयास्पदरित्या वावरणार्‍या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत राऊंड जप्त केले आहेत. काल, 16 मार्च रोजी वालीव पोलिसांनी ही कारवाई केली. जितु रामबापु पाल (वय 20 वर्षे, रा. भिवंडी) व हरेन्द्र प्रताप यादव (रा.नालासोपारा पूर्व) अशी सदर आरोपींची नावे ... Read More »

जव्हार नगर परिषदेकडून करोनाबाबत जनजागृती

प्रतिनिधी/जव्हार, दि. 17 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या आदेशाप्रमाणे जव्हार नगर परिषद क्षेत्रात करोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनजागृती सह विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. नगर परिषद स्तरावर नगर परिषद कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करून सक्षम नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच शहरातील हॉटेल्स, रेस्टोरेंट, लॉजिंग, खाजगी दवाखाने, सुपर मार्केट, राजकीय पक्ष कार्यालये, ... Read More »

जव्हारमध्ये स्वच्छता योजनेचे तीन तेरा; प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी/जव्हार, दि. 17 : जव्हार नगर परिषदेला गेल्या दोेन वर्षांपासुन स्वच्छतेचा पुरस्कार मिळत असुन या वर्षीही शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छतेच्या नावावार 2.5 कोटींची रक्कम मिळालेली आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे शहरात स्वच्छतेचे तीन तेरा झाले असुन योजनेचा बोजवारा उडालेला दिसत आहे. ठिक ठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. काही दिवसांपुर्वीच सोनारा आळी येथील पडीक सार्वजनिक शौचालय स्थानिकांच्या मगाणीवरून जमिन दोस्त ... Read More »

प्रा. डॉ. विलास जाधव यांची मुंबई विद्यापीठाच्या ग्रामीण विकास विभाग अभ्यास मंडळावर निवड

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 17 : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. डॉ. विलास जाधव यांची मुंबई विद्यापीठाच्या ग्रामीण विकास विभागाच्या अभ्यास मंडळावर स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. डॉ. विलास जाधव मागील 21 वर्षापासून कृषी विस्ताराच्या माध्यमातून पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करत असून शेती उत्पादन तसेच शेतकर्‍यांचे उत्पन्न ... Read More »

Scroll To Top