दिनांक 09 April 2020 वेळ 3:11 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » March » 04

Daily Archives: 04/03/2020

पालघर पोलिसांच्या छापेमारीच्या सोंगाचे पोस्टमार्टम

एफआयआर दाखल नसताना तुमचे पोलीस बेकायदेशीर छापा टाकतात! तुमच्या वरदहस्ताने हे होते का? वाचा याच पानावर! उद्या, 9 मार्च 2020 पर्यंत वाट पहा! पोलीस गुटखा पकडतात कि पचवतात? जप्त केलेला गुटखा जातो कुठे? पिंक लेक हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला की दरोडा टाकला? पालघर जिल्हा पोलिसांच्या कारवाया म्हणजे नुसतीच चिल्लाचिल्लम! कायदा सुव्यवस्थेचे काय? आमचा हा लेख अवश्य वाचा : “मिडिया” वाचकांनी ... Read More »

पालघर जिल्हा पोलिसांच्या कारवाया म्हणजे नुसतीच चिल्लाचिल्लम! कायदा सुव्यवस्थेचे काय?

पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदावर गौरव सिंह यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रेतीमाफियांच्या विरोधात धडाकेबाज कारवाई सुरु केली. गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले, गुटख्याच्या तस्करीला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला, जुगाराच्या अड्ड्यांवर छापेमारी केली. हे सर्व नियमितपणे चालू असताना देखील गुन्हेगारांचे कंबरडे प्रत्यक्षात मोडले गेलेच नाही. ना गुन्हेगारी नियंत्रणात आली, ना कायदा सुव्यवस्था नियंत्रणात राहिली. 29 जानेवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चा तर्फे ... Read More »

जिल्हा परिषद विषय समितीच्या सभापतींची निवड जाहीर

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 4 : पालघर जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापती पदाची निवडणूक आज, बुधवारी पालघर पंचायत समिती सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. किरण महाजन यांच्या अध्यक्षते खाली शांततेत पार पडली. यावेळी अनुष्का अरुण ठाकरे यांची महिला बाल कल्याण समिती सभापती पदावर, विष्णु लक्ष्मण कडव यांची समाज कल्याण समिती सभापती पदावर तसेच काशिनाथ गोंविंद चौधरी ... Read More »

भाजप पालघर जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार पाटील

प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : तालुक्यातील बिलावली येथील रहिवासी असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकुमार पाटील यांची भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवड केली आहे. नंदकुमार पाटील हे सुरुवातीपासून भाजपमध्ये सक्रिय असून त्यांनी बिलावलीचे सरपंच ते भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका चिटणीस, तालुकाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष व भाजपचे वाडा तालुका सरचिटणीस, तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस ... Read More »

जिल्हा परिषद उपाध्यक्षांची आरोग्य केंद्राला अचानक भेट

गैरहजर असलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाईची सूचना प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी तालुक्यातील गोर्‍हे प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन येथील कर्मचार्‍यांची अनुपस्थिती व ढिसाळ कारभाराची प्रत्यक्ष पाहणी करून गैरहजर असलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची सुचना जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे लेखी स्वरुपात केली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये कर्मचारी कामाच्या वेळेमध्ये सतत गैरहजर असल्याच्या व या ... Read More »

Scroll To Top