दिनांक 09 April 2020 वेळ 3:09 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » February » 04

Daily Archives: 04/02/2020

पालघर-बोईसर रस्त्यावर देशी पिस्टलसह एकाला अटक

पालघर, दि. 4 : देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या 31 वर्षीय तरुणाला पालघर पोलिसांनी जेरबंद केले असुन त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीची एक देशी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली आहे. एक इसम सोमवारी संध्याकाळी पालघर-बोईसर रस्त्यावरील प्रांत ऑफीस परिसराजवळ गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पालघर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक योगेश खोंडे, पोलीस हवालदार रविंद्र ... Read More »

सायवन आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा उपचाराअभावी मृत्यू

श्रमजीवीचा आश्रमशाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप; कारवाईची मागणी राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 3 : विक्रमगडमधील हिरवे-पिंपळगाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचे संशयास्पद आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच आता डहाणू तालुक्यातील सायवन आश्रमशाळेतील विशाल रमेश चौधरी या 13 वर्षीय मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. श्रमजीवी संघटेनेने या मृत्यूला आश्रमशाळा प्रशासन, आरोग्य विभाग व आरबीएसके पथकाला जबाबदार धरले असुन त्यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मिळालेल्या ... Read More »

वैद्यकिय अधिकार्‍यासाठी आंदोलनाचा इशारा

जुजबी मलमपट्टीवर चालतोय खोडाळा आरोग्य केंद्राचा कारभार प्रतिनिधी/मोखाडा, दि. 4 : तालुक्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील मागील 2 ते 3 वर्षांपासुन रिक्त असलेले वैद्यकिय अधिकार्‍याचे पद सतत पाठपुरवठा करुन देखील भरले जात नसल्याने यामुळे संतापलेल्या खोडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांनी याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या पटीत, महसुली गावे आणि दुप्पट खेडेपाडे संलग्न असलेल्या खोडाळा प्राथमिक आरोग्य ... Read More »

मानवाने निर्सगाचे उत्तम संगोपन केल्यास त्याची परतफेडही चांगलीच असेल! -राज्यपाल

प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण व निर्सगाचे संगोपन करणे ही प्रत्येक मनुष्याची जबाबदारी आहे. निर्सगाचे उत्तम संगोपन केल्यास निसर्गाकडून त्याची परतफेडही सुंदरच असेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. वाडा तालुक्यातील गालतरे येथे इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, आज मानवाने निर्सगाला भौतिक सुखासाठी ओरडबण्याचा प्रयत्न चालू ... Read More »

आदिवासींच्या पुढ्यातील थाळी हिसकावून घेऊ नका -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

विक्रमगडातील ग्रामसभेत राज्यपालांची उपस्थिती प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : आदिवासींना देण्यात आलेल्या वनपट्ट्यांचे अधिकार हिरावणे म्हणजेच त्यांच्या पुढ्यातील जेवणाची थाळी हिसकावण्यासारखे असून वनविभागाच्या प्रशासनाने आदिवासींच्या पुढ्यातील थाळी हिसकावून घेऊ नये, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विक्रमगड तालुक्यातील डोयापाडा येथील ग्रामसभेत वनविभागाच्या अधिकार्‍यांची कान उघडणी केली. आदिवासी समाजाला शासनाने वनपट्टे दिलेत. त्या जागेत घर आणि विहीरीसह शेतीपूरक बांधकाम करण्याचा अधिकार आदिवासींना ... Read More »

Scroll To Top