दिनांक 09 April 2020 वेळ 3:11 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » February

Monthly Archives: February 2020

मोखाड्यात प्राथमिक शिक्षण हक्क कायद्याचा धुल्या

प्रशिक्षण काळात शाळा बंद सरपंचाने घेतला हातात खडू पेसाच्या निधीतून नेमला शिक्षक शिक्षकांचा मोठा अनुशेष अधिकार्‍यांचे अक्षम्य दुर्लक्ष दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 28 : तालुक्यातील शिक्षकांना निष्ठा प्रशिक्षणासाठी नेमणुका दिल्याने सावर्डे येथील शाळा तब्बल 5 दिवस बंद होती. याबाबत सावर्डे येथील सरपंच हनुमंत पादीर यांनी वारंवार संपर्क साधूनही अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने दस्तुरखुद्द सरपंचानेच हातात खडू घेऊन ज्ञानदान केले असून या ठिकाणी ... Read More »

डहाणू एसटी आगारात मराठी भाषा दिवस साजरा

मराठी भाषा टिकवणे हि सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी! -अनुपमा जाधव प्रतिनिधी/डहाणू, दि. 27 : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या डहाणू आगारात आज, 27 फेबु्रवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी आणि वक्त्या म्हणून के. एल. पोंदा हायस्कूलच्या शिक्षिका व साहित्यिका सौ. अनुपमा जाधव, आगार व्यवस्थापक रा. सु. पाटील, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक अ. र. जाधव, वरिष्ठ ... Read More »

वाडा : विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

प्रतिनिधी/वाडा, दि.26 : शहरातील खंडेश्वरीनाका येथील कृषी विभागाच्या हद्दीतील विहिरीत चेतन रसिक मनोरे (27) नामक तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मृतदेह फुगल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर ही घटना उघडकीस आली. बुधवारी सकाळी खंडेश्वरी नाका येथील कृषी विभागाच्या जागेमध्ये असलेल्या विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती वाडा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी स्वतः आपल्या अधिकार्‍यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी ... Read More »

दाऊद टोळीशी संबंध असलेल्या कुख्यात गुंडाला नालासोपार्‍यातून अटक

पालघर दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 26 : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंध असलेल्या अख्तर कासमअली मर्चंट नामक कुख्यात गुंडाला नालासोपार्‍यातून अटक करण्यात यश आले असुन पालघर दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. मर्चंटवर मुंबई, ठाणे ग्रामीण व गुजरात राज्यात अपहरण, खंडणी तसेच ड्रग्स तस्करीशी संबंधित गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने पोलीस मागील दोन वर्षांपासुन त्याच्या ... Read More »

वाड्यात राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

प्रतिनिधी/कुडुस, दि. 26 : वाडा तालुक्यातील कुडुस नजीकच्या उचाट या गावी साहित्य कला विचार मंच आणि उचाट शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 1 मार्च 2020 रोजी होणार्‍या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. शैलजा करोडे यांची उपस्थिती लाभणार असुन समाजसेवक सुरेश भाऊराव मोरे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. उचाट येथील ... Read More »

पालघरमधील वाहतूक कोंडी फुटणार

खासदार राजेंद्र गावित यांनी घेतला पुढाकार जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न प्रतिनिधी/पालघर, दि. 26 : शहरातील मोठी समस्या बनलेला वाहतुक कोंडीचा प्रश्‍न लवकरच सुटणार असल्याचे चिन्हं आहेत. खासदार राजेंद्र गावित यांनी याकामी पुढकार घेतला असुन त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पालघर नगरपरिषद, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत ... Read More »

राज्यातील 917 शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा! – आमदार कॉ. विनोद निकोले

अन्यथा मंत्रालयावरच विद्यार्थ्यांचा मोर्चा आणण्याचा इशारा मुंबई/डहाणू : 20 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 917 शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन सरकार ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षण घेण्याचा अधिकार हिरावून घेत आहे, असा आरोप करुन राज्य सरकारच्या या निर्णयाचा डहाणू विधानसभेचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी तीव्र विरोध करत हा निर्णय राज्य सरकारने त्वरित रद्द करावा, अशी मागणी लेखी ... Read More »

जव्हारमध्येही भाजपाचे आंदोलन

प्रतिनिधी/जव्हार, दि. 25 : महाविकास आघाडी सरकार हे शेतकर्‍यांची फसवणूक करणारे फसवे सरकार आहे. या सरकारने कर्ज माफीच्या नावाखाली, शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप करत जव्हार भाजपाने आज, मंगळवारी जव्हार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी सरकारच्या निषेधासह विविध मागण्यांबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. भाजपाचा विश्वास घात करून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन ... Read More »

महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचा एल्गार

वाडा तहसीलदार कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन प्रतिनिधी/वाडा, दि. 25 : कर्जमाफीबाबत शेतकर्‍यांची फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार तसेच महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत आज भाजपच्या वाडा शाखेतर्फे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्थगिती सरकारचा धिक्कार असो… धिक्कार असो; महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध असो… निषेध असो; महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, अशा विविध घोषणांनी तहसीलदार कार्यालय परिसर ... Read More »

शेतकरी कर्जमुक्ती; जिल्ह्यातील असे व हमरापूर येथे आधार प्रमाणिकरणास प्रारंभ

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 24 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील असे व वाडा तालुक्यातील हमरापूर या गावातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्त प्रथम शेतकरी किसन लक्ष्मणराव चौधरी यांना आधार प्रमाणित नोंद प्रमाणपत्र देऊन या योजनेचा शुभारंभ आज, सोमवारी (दि. 24 फेब्रुवारी) करण्यात आला असल्याचे जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी सांगितले यावेळी सहाय्यक निबंधक ... Read More »

Scroll To Top