दिनांक 20 February 2020 वेळ 9:50 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » January » 13

Daily Archives: 13/01/2020

पालघर येथे आदिवासी सांस्कृतिक महा संमेलनाचे आयोजन

खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते उद्घाटन वार्ताहर/बोईसर, दि. 13 : आदिवासींच्या निसर्ग पूजक परंपरा, भाषा व कला संस्कृतीच्या संवर्धनासाठी तसेच या जनसमूहाचे अस्तित्व टिकवणे व त्यांच्या न्याय हक्कांबाबत जनजागृती करून मानवमुक्ती व प्रकृती या दोन मुद्द्यांवर समाजाला भेडसावणार्‍या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेतर्फे पालघर येथे तीन दिवसीय महा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या ... Read More »

वाडा : टायर फुटल्याने अपघात, कारचालकासह दोघे जखमी

प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : वाडा भिवंडी महामार्गावरील गांधे्र गावाच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारचा पुढचा टायर अचानक फुटल्याने झालेल्या अपघात कारचालकासह जखमी झाले आहेत. तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महामार्गावरील गांध्रे येथील महिंद्रा गाड्यांच्या शोरूमसमोर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात कारचालक विठ्ठल रघुनाथ बक्षी (वय 44) व प्रिया प्रताप पाटील (वय 52) हे दोघे गंभीर ... Read More »

स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी 151 सुर्यनमस्कार

डहाणूच्या महिलांची लिम्का बुकमध्ये नोंद राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 13 : दिनांक 12 जानेवारी रोजी, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिना निमित्ताने राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून येथील पतंजली योग समितीच्या योग वर्गातील 11 महिलांनी या दिवशी 151 सूर्यनमस्कार करण्याचा विक्रम केला आहे. चेतना योग या मुंबईतील प्रतिष्ठित संस्थेने मुंबईतील अंधेरी येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ... Read More »

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न

राजतंत्र न्युज नेटवर्क/सफाळे, दि. 13 : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय व राष्ट्रीय सेवा योजना मुंबई विभाग स्तर 2 यांच्यातर्फे सफाळे येथे 3 दिवसीय नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ठाणे, पालघर, मुंबई व रायगड या जिल्ह्यातून 129 शिबारार्थी, स्वंयसेवक व 26 कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले आहेत. शिबिरात एम. के. ज्युनिअर कॉलेज (चिंचणी) ... Read More »

Scroll To Top