दिनांक 26 May 2020 वेळ 5:44 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » January » 06

Daily Archives: 06/01/2020

पत्रकारिता जगण्यासाठी नव्हे, तर जगवण्यासाठी! -संजीव जोशी

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 6 : पत्रकारिता जगण्यासाठी नसून जगवण्यासाठी आहे आणि ती कुठल्याही दडपणाशिवाय करता आली पाहिजे, असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे अखिल भारतीय सरचिटणीस, तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू येथे बोलताना काढले. ते दर्पण दिनानिमित्त डहाणू व तलासरी तालुका पत्रकार परिषदेतर्फे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष ... Read More »

जव्हारमध्ये पत्रकार दिन साजरा

जव्हार तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर प्रतिनिधी/जव्हार, दि. 6 : 6 जानेवारी 1832 रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले. त्यात समाज प्रबोधनात्मक लिखाण करुन त्यांनी समाजाच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. असे हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले. त्यांच्या या कार्याची परंपरा सुरू ठेवत राज्यभरात 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. जव्हार ... Read More »

वाडा पोलिसांकडून उपसरपंचाच्या घराची झडती

दारुसाठा बाळगल्याचा होता संशय, उपसरपंचाच्या पत्नीची पोलिसांविरोधात तक्रार प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : वाडा तालुक्यातील आबिटघर गावचे उपसरपंच दयानंद पाटील यांच्या अनुपस्थितीत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाडा पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेऊन घरातील सामानाची नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांची पत्नी दिपीका पाटील यांनी वाडा पोलीस स्टेशनमध्ये एका लेखी तक्रारीद्वारे केली आहे. तक्रारीत दिपीका ... Read More »

Scroll To Top