दिनांक 26 May 2020 वेळ 4:38 AM
Breaking News
You are here: Home » 2020 » January » 05

Daily Archives: 05/01/2020

‘महाराष्ट्र सरपंच संसदे’ च्या जिल्हा समन्वयकपदी राजेंद्र दापट

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 5 : ‘एमआयटी -पुणे’ शिक्षण संस्था समुहाच्या ‘एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत ‘महाराष्ट्र सरपंच संसद’ स्थापन करण्यात आली आहे. या संसदेच्या पालघर जिल्हा समन्वयकपदी राजेंद्र दापट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यात होणाऱ्या सरपंच संसदेच्या कार्याचे ते समन्वयक असतील, अशी माहिती या संसदेचे कोकण विभागीय समन्वयक सुहास सातर्डेकर यांनी दिली आहे. ‘एमआयटी वर्ल्ड ... Read More »

आपलं सरकार हे शेतकरी, महिला व सर्वसामान्य जनतेचं सरकार! -एकनाथ शिंदे

प्रतिनिधी/वाडा, दि. 5 : राज्यात असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकरी, महिलावर्ग तसेच सर्वसामान्य जनतेसाठीचं सरकार असून उद्धव ठाकरे यांनी लागलीच सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असल्याचे तसेच महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायद्यात दुरुस्ती करणार असल्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी वाडा तालुक्यातील नेहरोली येथे झालेल्या प्रचारसभेदरम्यान सांगितले. 7 जानेवारी रोजी पालघर ... Read More »

6 व 7 जानेवारी रोजी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी! -जिल्हाधिकारी

पालघर, दि. 25 : जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणार्‍या आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी 6 जानेवारी तसेच मतदानाच्या दिवशी 7 जानेवारी रोजी पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणार्‍या आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम 17 ... Read More »

वाडा नगर पंचायतीच्या चारही विषय समित्या शिवसेनेकडे

प्रतिनिधी/वाडा, दि. 5 : वाडा नगर पंचायतीच्या विषय समित्यांच्या काल, शनिवारी झालेल्या निवडणुकीत चारही समित्यांवर शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीनंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. वाडा नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता असून नगरपंचायतीच्या विषय समित्यांकरिता आज निवडणूक झाली. शिवसेनेकडून नियोजन समितीकरिता नयना चौधरी, बांधकाम समितीकरिता वर्षा गोळे, पाणीपुरवठा समितीकरिता उर्मिला पाटील, महिला व बालकल्याण समितीकरिता जागृती काळण यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात ... Read More »

माहिती तंत्रज्ञानाबाबत महिलांनी जागृत राहावे! -पोलीस उपअधीक्षक प्रशांत परदेशी

दांडेकर महाविद्यालयात सायबर सेफ वूमन विषयावर कार्यशाळा संपन्न राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 5 : आजच्या आधुनिक काळात आर्थिक व सामाजिक माध्यमातून कार्य करत असताना पिन कोडचा (ओटीपी) वापर करावा लागतो, या पिन कोडची माहिती इतरांशी शेयर करू नये तसेच याबाबत कोणाला माहिती होणार नाही, याची काळजी महिलांनी घ्यावी. अशी काळजी घेतल्यास आपले बँकेशी संबंधित व्यवहार तसेच आपण वापरत असलेले समाज ... Read More »

सफाळ्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप सानप यांचे हृदयविकाराने निधन

प्रतिनिधी/डहाणू, दि. 5 : पोलीस रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यातील सफाळे येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप सानप यांचे निधन झाले. काल, शनिवारी (दि. 5) ही हृदयद्रावक घटना घडली. रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सफाळे येथील माकुणसार भागात क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी ... Read More »

Scroll To Top