दिनांक 18 January 2020 वेळ 11:10 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » December » 12

Daily Archives: 12/12/2019

रस्त्याच्या क्राँक्रीटीकरणाठी पालघरमध्ये वाहतुकीत बदल

राजतंत्र न्युज नेटवर्क/ पालघर दि. 12 : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हनुमान मंदीर चौक या रस्त्याचे क्राँक्रीटीकरण करण्यात आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकीत बदल करण्यात आला असुन 75 दिवस या मार्गावर केवळ एकेरी वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हनुमान मंदीर चौक हा रस्ता मुख्य वर्दळीचे ठिकाण असल्याने वैयक्तीक व सरकारी कामकाजासाठी ... Read More »

नायजेरियन भाडेकरुंची माहिती न देणार्‍या दोन घरमालकांवर गुन्हे

राजतंत्र न्युज नेटवर्क/नालासोपारा, दि. 12 : परदेशी नागरीकांना घर भाड्याने दिले असल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती देणे बंधनकारक केले असतानाही मागील 6 ते 7 महिन्यांपासुन नायजेरियन नागरीकांना भाडेकरु ठेऊन त्यांची माहिती न दिल्याने नालासोपार्‍यातील दोन घरमालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकुमार मोतीलाल यादव व रिजवाना सुज्जादिन शेख अशी सदर घरमालकांची नावे आहेत. राजकुमार यादव यांनी आपला नालासोपारा पुर्वेतील फ्लॅट मे ... Read More »

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मोखाड्यात काँग्रेसची निदर्शने

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 12 : भाजपा प्रणित केंद्र सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याने अनेक जिवनावश्यक वस्तुंचे अवाढव्य भाव वाढले आहेत. सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असुन गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे, असा आरोप करुन वाढत्या महागाईसह महिला अत्याचार व नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ मोखाड्यात काँग्रेसने निदर्शने करून मोखाडा तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. वाढती महागाई, महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, पेट्रोल डिझेल दरवाढ आदी ... Read More »

हरविलेल्या बालकांच्या शोधासाठी पोलिसांची मुस्कान मोहिम

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 12 : हरविलेल्या तसेच अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यभरात 1 ते 31 डिसेंबर दरम्यान ऑपरेशन मुस्कान- 7 ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. ही मोहिम पालघर जिल्ह्यात देखील सुरु करण्यात आली असुन जिल्ह्यातील 23 पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक पोलीस पथक नेमण्यात आलेले आहे. या पथकात 1 अधिकारी व 3 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या मोहिमेची ... Read More »

शिक्षक सेनेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी मनेश पाटील यांची निवड

प्रतिनिधी/कुडूस, दि. 12 : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदावर वाडा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक मनेश पाटील यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ही राज्यातील शिक्षकांची नोंदणीकृत व शासनमान्यता प्राप्त संघटना आहे. या संघटनेचे राज्याध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी ... Read More »

मनोर : अज्ञाताने केलेल्या गोळीबारात प्रॉपर्टी डीलर थोडक्यात बचावला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना वार्ताहर/बोईसर, दि. 12 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर-टेन गावच्या हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एका कारवर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली असून कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे कारच्या मागील सीटच्या काचेवर गोळी लागल्याने तो बचावला आहे. या प्रकरणी मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबई येथील रहिवासी सुजित पाटकर हे बुधवारी (दि. ... Read More »

Scroll To Top