दिनांक 18 January 2020 वेळ 11:12 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » December » 08

Daily Archives: 08/12/2019

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वाड्यात प्रशिक्षण मेळावा

स्वयंसहायता बचत गटांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री हजारो महिलांची उपस्थिती; बचतगटांचा सहभाग बचतगटाच्या उत्पादनाला व्यापारचिन्ह देण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील! -चंद्रकांत वाघमारे प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण्याच्या उद्देशाने वाडा पंचायत समिती व उमेद संस्थेच्या माध्यमातून महिला प्रशिक्षण मेळावा वाड्यातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शनिवारी (दि. 7) आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यरत असलेल्या स्वयंसहायता महिला बचत ... Read More »

अन्नदिनाचे ओझे शिक्षकांच्या खांद्यावर

शिक्षकांच्या उपस्थितीत धान्य वितरण करण्याला शिक्षकांचा विरोध विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती प्रतिनिधी/वाडा-कुडूस, दि. 8 : शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहचविण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा विभागाची असताना अन्नदिनाच्या नावाखाली जिल्ह्यातील शिक्षकांना या कामाला जुंपल्याने शिक्षकांमध्ये असंतोष असून याविरोधात शिक्षक सेनेच्या वतीने वाडा तहसिलदारांना शनिवारी (दि. 7) निवेदन देण्यात आले आहे. अगोदरच शिक्षकांवर निवडणूकीची कामे, जनगणना, स्वच्छता अभियान राबविणे ... Read More »

तलासरी : दरोड्यातील आरोपींना पाच वर्षांची शिक्षा

पालघर सत्र न्यायालयाचा निकाल प्रतिनिधी/डहाणू, दि. 8 : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी हद्दीत लघुशंकेसाठी गाडी थांबवलेल्या कारमधील प्रवाशांना बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर किंमती ऐवज लुटून पोबारा करणार्‍या दोन दरोडेखोरांना पालघर येथील सत्र न्यायालयाने 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 22 नोव्हेंबर 2014 रोजी यातील फिर्यादी व त्यांचे इतर 4 सहकारी आपल्या एम.एच.11/बी.ई. 700 या क्रमांकाच्या ... Read More »

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आणखी एका आरोपीला कारावास

प्रतिनिधी/डहाणू, दि. 8 : अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग करुन अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पालघर येथील जिल्हा न्यायालयाने आणखी एका आरोपीला पोस्को (बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा) कायद्यांतर्गत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राजेश सना शिंगडा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 15 दिवसांपुर्वीच अशाचप्रकारच्या गुन्ह्यातील अन्य एका आरोपीला न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मार्च 2017 रोजी ... Read More »

Scroll To Top