दिनांक 03 July 2020 वेळ 3:50 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » December » 01

Daily Archives: 01/12/2019

निवृत्त कर्मचार्‍यांना निवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफ

पालघर पंचायत समिती शिक्षण विभागाचा निर्णय राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 1 : शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर पीएफ व उपदान मिळावे यासाठी काही कालावधी जातो. परंतु पालघर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने निवृत्त कर्मचार्‍यांचा हा त्रास कमी व्हावा म्हणून एक नवीन पायंडा पाडण्याचे ठरवले आहे. कर्मचारी ज्या दिवशी निवृत्त होईल, त्याच दिवशी पीएफ व उपदानाचे धनादेश त्यांना देण्यात येतील. काल, शनिवारी हा ... Read More »

विश्वासदर्शक ठरावादरम्यान डहाणूचे आमदार तटस्थ

प्रतिनिधी/डहाणू, दि. 1 : शनिवारी (दि.30) विधानसभेत नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान, डहाणू 128 विधानसभा (अ.ज.) मतदारसंघाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद भिवा निकोले हे तटस्थ राहिले. यावर पत्रकारांशी बोलताना, महाविकास आघाडीने तयार केलेल्या समान किमान कार्यक्रमात आदिवासी जनतेच्या प्रश्नाचा साधा उल्लेख देखील नाही. त्याबरोबरच असंघटित आणि कंत्राटी कामगारांची उन्नती, मच्छिमारांचे आणि शेतकर्‍यांचे प्रश्न याविषयी सरकारच्या समान किमान कार्यक्रमात भूमिका ... Read More »

वाडा डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरीत करावे; भाजपची नगरपंचायतीकडे मागणी

प्रतिनिधी/वाडा, दि. 1 : वाडा शहरासाठी असलेले डम्पिंग ग्राऊंड अन्यत्र स्थलांतरीत करण्यात यावे या मुख्य मागणीसह शहरातील खड्डेयुक्त रस्ते, पार्किंग अभावी होणारी वाहतूक कोंडी, नादुरुस्त व जुनी झालेली कचरा वाहतूकीची वाहने आदी समस्यांबाबतचे निवेदन वाडा शहर भाजपच्या वतीने नगरपंचायतीला देण्यात आले आहे. वाडा शहराचे डम्पिंग ग्राऊंड सद्यस्थितीत वैतरणा (सिद्धेश्वरी) नदीलगत असून याच नदीतील पाणी शहराला पाणी पुरवठा योजनेद्वारे पुरविले जात ... Read More »

डहाणू : वरवाडा आश्रम शाळेतील विद्यार्थीनीची आत्महत्या

वार्ताहर/डहाणू, दि. 1 : डहाणू तालुक्यातील घाट (पाटीलपाडा) येथील कु. सारिका रघु पाटकर या 16 वर्षीय विद्यार्थीनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सारिका ही वरवाडा आश्रम शाळेत इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होती. मात्र अभ्यास झेपत नसल्याने तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. डहाणू तालुक्यातील पाटीलपाडा येथील चार मैत्रिणींनी आपले दहावीपर्यंतचे एकत्र शिक्षण ... Read More »

बोईसर : महावितरणाच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला दिड हजारांची लाच घेताना अटक

नवीन मीटरसाठी केलेल्या अर्जांच्या सर्वेक्षणासाठी केली होती लाचेची मागणी राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 1 : महावितरणच्या बोईसर उप विभागाच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला दिड हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. बोईसमधील भिमनगर येथे शनिवारी (दि.30) ही सापळा कारवाई करण्यात आली. पंकज सदानंद धनपाल (36) असे सदर लाचखोर तंत्रज्ञाचे नाव असून नवीन मीटरसाठी केलेल्या अर्जाचे सर्वेक्षण करण्यासाठी ... Read More »

Scroll To Top