दिनांक 04 July 2020 वेळ 1:53 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » November » 17

Daily Archives: 17/11/2019

आशा, ए.एन.एम. व आरोग्य केंद्रांना विविध आरोग्य उपकरणांचे वाटप

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 17 : मोखाड्यातील रुग्णांना गाव पातळीवरच आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने आरोहन व सिमेन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आशा प्रकल्पांतर्गत आशा कार्यकर्त्या, ए.एन.एम. आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना विविध आरोग्य उपकरणांचे वाटप विक्रमगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार सुनील भूसारा यांच्या हस्ते करण्यात आले. 14 नोव्हेंबर या बालदिनाचे औचित्य साधून या उपकरणांचे वाटप करण्यात आले. आरोहन ही संस्था लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी मोखाडा, ... Read More »

पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड; शेतातील सडलेले पीक करताहेत गोळा

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 17 : पालघर जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्टमध्ये मुसळधार, त्यानंतर परतीच्या आणि आता अवकाळी पावसाने संपुर्ण भातशेती नष्ट झाली आहे. त्यातही राज्यपालांनी हेक्टरी 8 हजार रूपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. त्यामुळे, वर्षभर कशी गुजराण करायची या विवंचनेत असलेल्या शेतकर्‍यांनी शेतात सडलेले पीक गोळा करायला घेतले आहे. कुठे पायलीभर, तर कुठे पोतं – ... Read More »

खोडाळ्यातील आरोग्य सेवेविरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

वैद्यकीय अधिकार्‍यांची दोन्हीही पदे रिक्त पशुवैद्यकीय दवाखान्याचीही परवड प्रतिनिधी/मोखाडा, दि. १७ : मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही केंद्रस्थानी असलेली महत्त्वाची बाजारपेठ आहे. असे असतानाही येथील आरोग्य सेवा रामभरोसे असल्याचे दिसत आहे. मागील 6 महिन्यांपासुन या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने आदिवासी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे वैद्यकिय अधिकार्‍याची त्वरित व कायमस्वरूपी नियुक्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खोडाळा ... Read More »

शिवसेनेच्या वतीने आदिवासी कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज, रविवारी (दि. 17) तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने मायेची उब म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे पालघर जिल्हा सह समन्वयक गोविंद पाटील यांच्या पुढाकाराने व नवनिर्माण कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने तालुक्यातील नांदणी व अबंरभुई येथील 70 आदिवासी कुटुंबियांना बँल्केट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी ... Read More »

डहाणूत पार पडला ज्येष्ठांचा वाढदिवस सोहळा

प्रतिनिधी/डहाणू, दि. 17 : डहाणू येथील जेष्ठ नागरिक संघातर्फे, प्रथे प्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील सभासदांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाचा सोहळा 16 नोव्हेंबर रोजी संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. आजच्या तरुणाई प्रमाणेच प्रत्येक जेष्ठ सभासदाला कौटुंबिक वाढदिवस सोहळ्याबरोबरच मित्रांच्या सहवासात वाढदिवस साजरा करण्याचा आनंद मिळावा म्हणून दर महिन्याला अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष रमेश शिर्के, उपाध्यक्ष मारुती वाघमारे, सचिव बापुराव ... Read More »

ढवळे महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची रॅगिंग

15 वरिष्ठ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल वार्ताहर/बोईसर, दि. 18 : पालघर येथील डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या होमिओपॅथिक महाविद्यालयात नव्याने दाखल झालेल्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची वरिष्ठांकडून रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिला डॉक्टरने याबाबत पालघर पोलीस स्टेशनमध्ये आपल्यावर मानसिक छळ केल्याची तक्रार नोंदवली असुन त्यानुसार संबंधित 15 वरिष्ठ डॉक्टरांविरोधात रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 ... Read More »

Scroll To Top