दिनांक 03 July 2020 वेळ 2:47 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » November

Monthly Archives: November 2019

जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या! -उद्धव ठाकरे

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि.29 : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आज, शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान ... Read More »

वाडा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न

प्रतिनिधी/कुडूस, दि. 29 : वाडा तालुक्यातील तानसा ग्लोबल स्कूल (घोणसई-मेट) येथे वाडा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी तालुक्यातील विविध शाळांमधील कर्तुत्ववान शिक्षकांचा मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला. दरम्यान, तानसा ग्लोबल स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले असुन तीन दिवस चालणार्‍या या प्रदर्शनात अनेक विज्ञान प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालघर जिल्हा ... Read More »

विरार : नायजेरियन भाडेकरुंची माहिती न देणार्‍या आणखी एका घरमालकावर गुन्हा

राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 28 : वारंवार आवाहन करुनही व कारवाईचा इशारा देऊनही भाडेकरु ठेवलेल्या परदेशी नागरीकांची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न देणार्‍या घरमालकांविरोधात पालघर जिल्हा पोलिसांनी कारवाईची मोहिम सुरु केली असुन अशा अनेक घरमालकांविरोधात मागील महिन्याभरात गुन्हे दाखल केले आहेत. आता आणखी एका घरमालकाविरोधात विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोराई-2 येथे राहणार्‍या सोहन भरतलाल अडवाणी ... Read More »

बोईसर : 8 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीला 7 वर्षांची शिक्षा

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 25 : 8 वर्षीय अल्पवयीन मुलाला आंबा देण्याचे आमिष दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला न्यायालयाने 7 वर्षे कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राजकिशोर माहत्तम भगत (वय 25) असे सदर आरोपीचे नाव आहे. पाच वर्षांपुर्वी 3 मे 2014 रोजी ही घटना घडली होती. बोईसर रेल्वेस्टेशनच्या पुर्व भागात राहणारा पीडित 8 वर्षीय ... Read More »

वसईतील प्रेमीयुगुलाची वाड्यात आत्महत्या

केळठण येथील घटना प्रतिनिधी/कुडूस, दि. 28 : वसई तालुक्यातील योजना पारधी व नितीन भुजड या प्रेमी युगुलाने बुधवारी (दि.27) दुपारच्या सुमारास वाडा तालुक्यातील केळठण गावच्या हद्दीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने हळहळ व्यक्त होत असुन कुटूंबियांचा त्यांच्या लग्नास विरोधात असल्याने दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंता पारधी (वय 17) ... Read More »

खळ्यातील भाताच्या भार्‍यांना आग; वाड्यातील शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान

प्रतिनिधी/वाडा, दि. 27 : तालुक्यातील गौरापूर गावातील शेतकरी बाळकृष्ण राऊत यांच्या खळ्यातील भाताच्या भार्‍यांना अचानक आग लागून 800 भारे जळून खाक झाले असून यात त्याचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आज, बुधवारी (दि.27) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. अवेळी पडणार्‍या पावसाने शेतकरी पार मेटाकुटीस आला आहे. त्यात हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बाळकृष्ण राऊत हा शेतकरी आर्थिक संकटात ... Read More »

लेखी आश्वासना अंती पाणलोट सचिवांचे उपोषण मागे

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 27 : थकीत मानधनाच्या मागणीसाठी सोमवार (दि. 25) पासुन खोडाळा मंडळ कृषी कार्यालयासमोर तिसर्‍यांदा बेमुदत उपोषणाला बसलेल्या तालुक्यातील पाणलोट सचिवांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. संबंधित अधिकार्‍यांनी 27 डिसेंबर पूर्वी थकीत मानधनाची संपुर्ण रक्कम अदा करण्याची लेखी हमी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मोखाडा तालुक्यातील 13 पाणलोट सचिवांनी काम केले आहे. मात्र ... Read More »

वाणगावमध्ये 30 ते 35 गाईंचा संशयास्पद मृत्यू

वार्ताहर/बोईसर, दि. 27 : डहाणू तालुक्यातील वाणगावमध्ये 30 ते 35 मोकाट गाईंचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. येथील माटगाव गावाच्या परिसरात सदर गाईंचे मृतदेह आढळून आले असुन एखाद्या बागायतदाराने विषप्रयोग करुन या गाईंची हत्या केल्याचा अंदाज येथील गावकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. माटगावच्या आसपास मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व मिरची बागायती आहेत. त्यात भाजीपाल्यासह अन्य पिकांची लागवड केली जाते. रात्रीच्या ... Read More »

वाडा नगरपंचायतीच्या उप नगराध्यक्षापदी काँग्रेसच्या विशाखा पाटील

वाडा नागरपंचायतीतही महाविकास आघाडी प्रतिनिधी/वाडा, दि. 27 : वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या विशाखा पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. या निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या वैभव भोपतराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र ऐन वेळी त्यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. वाडा नगरपंचायतीमध्ये एकुण 17 सदस्य संख्या असून यामध्ये शिवसेना 6, भाजप 6, ... Read More »

सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पीसीपीएनडीटी कायद्याचे काटेकोर पालन करावे! -जिल्हा शल्य चिकित्सक

पालघर, दि. 27 : समाजातील विविध घटकाने मुलीच्या जन्म दारात वृध्दी आणण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून गर्भधारणा पूर्व आणि प्रसवपुर्व निदान तंत्रे लिंगनिवड प्रतिबंध अधिनियम 1994 (पी.सी.पी.एन.डी.टी.) कायद्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांनी केले. पालघर पंचायत समिती सभागृहात पीसीपीएनडीटी कायद्याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कांचन वानेरे बोलत होत्या. पीसीपीएनडीटी अंतर्गत घडणार्‍या ... Read More »

Scroll To Top