दिनांक 26 May 2020 वेळ 4:34 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 14

Daily Archives: 14/10/2019

आदिम जमातीतील शेकडो कुटूंबे 2 वर्षांपासुन घरकुलाच्या प्रतिक्षेत!

सरकारी बाबुंच्या अनास्थेमुळे लाभार्थ्यांच्या अर्जावर साठली धूळ प्रतिनिधी/मोखाडा, दि. 14 : केंद्र आणि राज्य सरकारने कोणतेही कुटूंब बेघर राहणार नाही. यासाठी विविध घरकुल योजना राबविल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी आदिम जमातीला प्राधान्यक्रम देण्याचे धोरण आखले आहे. तसेच आदिम जमातीसाठी केंद्र सरकारने विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत, शबरी घरकुल योजनेवर आधारित घरकुल योजना आणली आहे. या योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षात शेकडो आदिम ... Read More »

विक्रमगड मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर

निवडणूक वार्तापत्र (संजीव जोशी) : येथून सुरेखा विठ्ठल थेतले (माजी जिल्हा परिषद अध्यक्षा), हरिचंद्र सखाराम भोये व मधुकर धर्मा खुताडे या 3 भाजप बंडखोरांसह भास्कर लक्ष्मण बेंडगा, शिवराम धावजी गिरंधला, दिपक लहु महाकाळ या अपक्षांनी निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. मतदारसंघाची पार्श्वभूमी: विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा 2009 मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला. तत्पूर्वी जव्हार, मोखाडा व तलासरी या तालुक्यांचा मिळून ... Read More »

तलासरीत कारमधून 2 लाखांचा गुटखा जप्त

राजतंत्र न्युज नेटवर्क/तलासरी, दि. 14 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी हद्दीत पोलिसांनी वाहनांच्या तपासणीदरम्यान एका कारमधून 2 लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. तसेच याप्रकरणी कारच्या चालकाला ताब्यात घेतले असुन त्याच्याविरुद्ध तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे 4.30 च्या सुमारास महामार्गावरील काजळी उड्डाणपुलाजवळ ही कारवाई करण्यात आली. तलासरी पोलिसांनी एम.एच. 48/ए.के. 1238 या क्रमांकाच्या हुंदाई ऐक्सेट कारला अडवून ... Read More »

सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळातर्फे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 14 : पालघर जिल्ह्यातील पूर्व भागात असणार्‍या व नेहमी समाज कार्यात सर्वात जास्त अग्रेसर असणार्‍या सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात रक्तगट, बॉडी मास इंडेक्स, रक्तदाब, ईसीजी, रक्त शर्करा, डोळे आणि मोती बिंदू तपासणी, कॅल्शियम डेफिशियनशी अशा विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. शिबीराचे उद्घाटन ... Read More »

महायुतीचे उमेदवार हेमंत सवरांनी मोखाडा काढला पिंजून!

शेवटच्या टोकापर्यंत प्रचार प्रत्यक्ष गृह भेटीवर भर प्रतिनिधी/मोखाडा, दि. 14 : शिवसेना-भाजप महायुतीचे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांनी आज, सोमवारी तालुक्यातील सुर्यमाळ येथून प्रचार दौर्‍याला सुरुवात करुन तालुक्यातील थेट गुजरात हद्दीपर्यंतचा परिसर अक्षरशः पिंजून काढला. या प्रचार दौर्‍यात त्यांनी प्रत्यक्ष गृह भेटीवर विशेष भर दिला असून मतदारांशी थेट संवाद साधला आहे. मतदारांनीही यावेळी त्यांना चांगला प्रतिसाद दिल्याचे ... Read More »

Scroll To Top