दिनांक 26 May 2020 वेळ 5:35 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 07

Daily Archives: 07/10/2019

अवैधरित्या दारुची वाहतूक, दोघांविरोधात गुन्हे दाखल

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 7 : डहाणू तालुक्यातील चिंचणी व पालघर तालुक्यातील सातपाटी येथे अवैधरित्या स्कुटीच्या डिक्कीमध्ये लपवून दारुची वाहतूक करणार्‍या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन दोन्ही स्कुटी देखील जप्त केल्या आहेत. 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.40 च्या सुमारास वाणगाव पोलीस चिंचणी-खाडीनाका चौकी येथे वाहनांची तपासणी करत असताना एम.एच.48/ए.ए.1735 या क्रमांकाच्या स्कुटीचालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र गाडीच्या डिक्कीत ... Read More »

अर्नाळ्यात गावठी हातभट्टी उध्वस्त

1120 लिटर गावठी दारुसह 3.89 लाखांचा मुद्देमाल जप्त राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 7 : अर्नाळ्यातील समुद्रकिनारी बेकायदेशीररित्या हातभट्टी लावून गावठी दारु तयार केल्या जाणार्‍या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 1120 लिटर गावठी दारुसह एकुण 3 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला आहे. तसेच याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्नाळा किल्ला समद्रकिनारी असलेल्या इलेक्ट्रीक ... Read More »

बोईसरमध्ये जुगाराच्या अड्ड्यावर छापा; 16 जुगार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

1.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 7 : येथील शिवाजीनगर भागातील एका इमारतीत सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकत एकुण 16 जुगार्‍यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तसेच त्यांच्याकडून 1 लाख 82 हजारांची रक्कम जप्त केली आहे. बोईसर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने संयुक्तरित्या ही कारवाई केली. शिवाजीनगर-सालवड हद्दीतील संतोषी बार असलेल्या इमारतीच्या पहिल्या ... Read More »

नाशेरा येथील 200 वनमजूर उपोषणाच्या मार्गावर

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 7 : तालुक्यातील नाशेरा येथील वनमजुरांनी गेल्या जुलै महिन्यात वृक्ष लागवडीचे काम केले आहे. मात्र मागणी करूनही आजतागायत या मजुरांना आपल्या कामाची मजुरी मिळाली नसल्याने येत्या 15 तारखेपासुन खोडाळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार या वनमजुरांनी व्यक्त केला आहे व तसे निवेदनही संबंधितांना देण्यात आले आहे. खोडाळा वनपरिक्षेत्र हद्दीत येणार्‍या नाशेरा वनपट्ट्यात जुलै महिन्यामध्ये तब्बल ... Read More »

Scroll To Top