दिनांक 26 May 2020 वेळ 4:27 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 06

Daily Archives: 06/10/2019

कोमसापच्या जव्हार शाखेचे उदघाटन!

प्रतिनिधी/जव्हार, दि. 6 : कोकण मराठी साहित्य परिषदे (कोमसाप) च्या जव्हार शाखेचे उद्घाटन व विविध पुस्तकांचा प्रकाशन सोहळा काल, 5 ऑक्टोबर रोजी येथील संकल्प हॉटेलच्या सभागृहात पार पडला. कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्यश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते जेष्ठ साहित्यिक ग. बा. सरदार यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. अशोक ठाकूर, कार्याध्यक्ष नमिता ... Read More »

परतीच्या पावसाने घरांचे नुकसान

प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : तालुक्यात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास परितीच्या पावसाने सोसाट्याच्या वार्‍यासह दमदार हजेरी लावल्याने दिनकरपाडा येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. जयेंद्र दिनकर, उत्तम चौधरी, लहू वेखंडे यांच्यासह गावातील 30 घरांवरील कौले व सिमेंटचे पत्रे उडून गेल्याने अर्थिक नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती उप सरपंच दीपक मोकाशी यांनी दिली. यात लहू वेखंडे यांच्या घराची ... Read More »

युतीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीला आमदार शांताराम मोरे वाड्यात

माजी मंत्री विष्णू सवरा यांचीही घेतली सदिच्छा भेट आजवर केलेल्या विकास कामांमुळे येथील जनता मला पुन्हा विजयी करेल -आमदार शांताराम मोरे प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : आजवर आपण भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांच्या बळावरच येथील जनता मला पुन्हा विजयी करेल, असा विश्वास भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना व महायुतीचे उमेदवार आमदार शांताराम मोरे यांनी वाडा येथे व्यक्त केला. ... Read More »

मोखाड्यातील 195 महिला बचत गटांना अनुदानाअभावी घरघर

9 महिन्यांपासुन अनुदानाची प्रतिक्षा नवरात्र-दिवाळीही कडकीत दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 6 : तालुक्यातील 229 अंगणवाडी केंद्रांमधुन पोषण आहार पुरविणार्‍या 195 बचत गटांना मागील 9 महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे अंगणवाडीतील कुपोषित बालकांना पोषण आहार पुरविताना अगोदरच दुर्बल असणार्‍या बचत गटांना अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा आर्थिकदृष्ट्या कुपोषित असलेल्या एकूणच बचतगटांची प्रलंबित देयके अदा करण्याबाबत महिला व बालकल्याण आयुक्तालयाकडून व ... Read More »

कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान महोत्सव संपन्न

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 6 : तालुक्यातील कोसबाड हिल येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रात 2 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत पोषण आधारित शेती पद्धती या संकल्पनेला अनुसरून कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन कृषी भूषण यज्ञेश सावे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना व्यावसायिक शेती कशी करावी याबाबत स्वानुभाववरून सविस्तर मार्गदर्शन केले. तर केंद्राचे शास्त्रज्ञ ... Read More »

पालघर : भरधाव जहाजाची बोटीला धडक

30 नॉटिकल अंतरावर घडला अपघात सुदैवाने सर्व खलाशी बचावले वार्ताहर/बोईसर, दि. 6 : पालघरजवळील मुरबे येथील सुनील कान्हा तरे या मच्छीमार बांधवाच्या आई एकविरा बोटीला काल, शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या अन्यधान्य मालवाहू जहाजाने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बोटीचे मोठे नुकसान झाले आहे. मुरबे गावातील सुनील कान्हा तरे यांच्या आई एकविरा ... Read More »

Scroll To Top