दिनांक 26 May 2020 वेळ 5:18 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 03

Daily Archives: 03/10/2019

शिवसेनेतील बंडाळी युतीला ठरणार मारक; प्रकाश निकम समर्थकांचे शक्तीप्रदर्शन

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 3 : विक्रमगड विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्याने पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम यांनी काल, बुधवारी (दि. 3) आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज निकम यांच्या हजारो समर्थक व चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जोरदार शक्तीप्रदर्शन करत निकम यांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे साकडे घातले आहे. यावेळी शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या. त्यामुळे निकम यांची बंडाळी आघाडीला फायद्याची ... Read More »

प्रतिस्पर्ध्यांच्या पक्ष बदलाने निवडणुकीतील चुरस कायम

शहापूर मतदारसंघात दरोडा-बरोरा पुन्हा आमनेसामने (निवडणूक विशेष वृत्त) प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : शहापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेने प्रवेश देत या निवडणुकीत उमेदवारीही दिल्याने नाराज झालेले शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत शिवसेनेला धक्का दिला आहे. दरोडा आणि बरोरा यांच्यात गेली 25 वर्ष राजकीय हाडवैर असल्याने एका म्यानेत दोन तलवारी राहू शकत ... Read More »

भाजपाचे महायुतीचे उमेदवार पास्कल धनारेंचा डहाणूतून अर्ज दाखल

प्रतिनिधी/तलासरी, दि. 3 : भाजपा महायुतीचे डहाणू विधानसभा मतदार संघाचे उमेदवार पास्कल धनारे यांनी आज शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख संतोष शेट्टी, भाजपचे शहराध्यक्ष भरत शहा, सेनेचे शहराध्यक्ष संतोष कांबळी यांच्या उपस्थितीत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे आपला उमदेवारी अर्ज सुपूर्द केला. संबंधित बातमी : ... Read More »

श्रीनिवास वनगा व विलास तरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

श्रीनिवास वनगांना पालघर, तर विलास तरेंने बोईसर मतदार संघातून दाखल केला अर्ज वार्ताहर/बोईसर, दि. 3 : कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला… येऊन येऊन येणार कोण शिवसेनेशिवाय आहे कोण… अशी घोषणाबाजी व ढोल ताश्याच्या गजरात शिवसेनेचे पालघर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीनिवास वनगा व बोईसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार विलास तरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ... Read More »

तलासरी येथे बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; 202 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

राजतंत्र न्युज नेटवर्क/तलासरी, दि. 3 : 150 व्या गांधी जयंतीचे औचित्य साधून काल, 2 ऑक्टोबर रोजी तलासरी पंचायत समिती व लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांकरीता एक दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 202 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या तल्लख बुद्धीचे दर्शन घडवले. स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून लार्सन अँड टुब्रो ट्रस्टचे ... Read More »

Scroll To Top