दिनांक 26 May 2020 वेळ 6:21 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » October » 02

Daily Archives: 02/10/2019

शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते प्रकाश निकम यांचा ना’राजीनामा’

पक्ष सदस्यत्वही सोडले पक्षाने उमेदवारी डावलल्याची खंत दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 2 : आगामी विधानसभा निवडणूकीत विक्रमगड मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडे शर्तीचे प्रयत्न करुन देखील डावलले गेल्याचा आरोप करत प्रकाश निकम यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वाबरोबरच पालघर जिल्हा परिषद गटनेते पदाचा राजीनामा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठविला आहे. निकम यांच्या राजीनाम्यामुळे विक्रमगडमधील शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली असून निकम यांच्या ... Read More »

गांधी जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न!

प्रतिनिधी/वाडा, दि.2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मजूर कामगार यांच्या वतीने वाड्यात सफाई अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी पुरुषांसह शेकडो महिलांनी सहभाग घेत वाड्यातील प्रमुख ठिकाणी सफाई केली. तर वाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी देखील तहसील व पोलीस स्टेशन परिसरात सफाई केली. तत्पुर्वी सकाळच्या सुमारास वाड्यातील महात्मा गांधी ... Read More »

खोडाळ्याच्या जगदिश दोंदे यांचे लोकसेवा आयोग परिक्षेत यश

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 2 : तालुक्यातील खोडाळा गावचे सुपूत्र जगदिश दोंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत घवघवित यश संपादीत केले आहे. तालुक्यातून प्रथमच अशा प्रकारे लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होऊन तालुका कृषी अधिकारी होण्याचा बहूमान दोंदे यांनी मिळवला असल्याने त्यांचे सर्वच थरातून अभिनंदन केले जात आहे. आदर्श शिक्षक राज्यपुरस्कार लाभलेल्या आजोबांकडून सुसंस्काराचे आणि शिक्षणाचे बाळकडू मिळालेले जगदिश दोंदे एमएससी अ‍ॅग्रीकल्चर पदवीधारक ... Read More »

मांगाठणे-सापरोंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जान्हवी पाटील

प्रतिनिधी :कुडूस, दि. 2 : वाडा तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी सापरोंडे-मांगाठणे ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक काल, मंगळवारी (दि. 1) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा भोईर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जान्हवी जितेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणूकीत रविंद्र राठोड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. जान्हवी पाटील या गेल्या दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असुन त्यांच्या ... Read More »

Scroll To Top