दिनांक 17 January 2020 वेळ 9:10 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » October

Monthly Archives: October 2019

पालघर जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

सलग दुसर्‍या वर्षी जिल्हा दुष्काळाच्या गर्तेत दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 31 : पालघर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यामध्ये मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान केले असुन मागील 3 महिन्यांपासुन शासनाकडून या नुकसानीची भरपाई मिळेल म्हणून शेतकरी वाट पाहत आहेत. असे असताना आता जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर परतीच्या पावसाने अवकृपा केली असुन ऑगस्टमधील आसमानी संकटातून कसेबसे सावरलेले भातपीक परतीच्या पावसामुळे शेतातच कुजू लागले आहे. त्यामुळे शेतकरी ... Read More »

एसटी बसची दुचाकीला धडक, 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

वाडा येथील घटना कोल्हापूर-डहाणू बसच्या चालकाला अटक प्रतिनिधी/वाडा, दि.31 : वाडा-मनोर महामार्गावरील पाली येथील पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. काल, बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. जयेश लखमा गुरव (रा.आलोंडा, ता. विक्रमगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयेश हा कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरुन आलोंडा येथील आपल्या घरी ... Read More »

वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पालघर येथे राष्ट्रीय एकता दौड संपन्न

प्रतिनिधी/डहाणू, दि. 31 : देशाचे माजी उप प्रधानमंत्री तथा गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पालघर येथे राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमामध्ये पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, निवासी उप जिल्हाधिकारी संदिप जाधव, बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, पालघरचे तहसिलदार सुनिल जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी माधव मते, नायब तहसिलदार ... Read More »

दिवाळी निमित्ताने गरीब व गरजूंना मिठाई, कपडे व जेवण वाटप

आगाशी-टेंम्बीपाडा येथील राजे ग्रुपचा उपक्रम राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 30 : मागील अनेक वर्षांपासुन दिवाळी सणादरम्यान फटाके फोडून शेकडो-हजारो रुपयांची राख करणारी तरुणाई बदलत्या काळानुसार व प्रदुषणाचा धोका लक्षात घेता सामाजिक उपक्रमांकडे वळताना दिसत असुन अशाचप्रकारे आगाशी-टेंम्बीपाडा येथील राजे ग्रुपतर्फे विरार परिसरातील अनेक भागात शेकडो गरीब व गरजू लोकांना मिठाई, कपडे व जेवण वाटप करुन आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. ... Read More »

डहाणू विधानसभा मतदारसंघ भाजपाने कसा गमावला?

Sanjeev Joshi/Rajtantra Media: डहाणूचे पराभूत आमदार पास्कल धनारे हे लाल बावट्यातून भाजपमध्ये आले आणि चिंतामण वणगांचे विश्वासू कार्यकर्ते बनले. रेशनिंग दुकानदार आणि दारुच्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेले होते. भाजपमधील तलासरी तालुक्यातील एक हुकमी कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांना मोदी लाटेत विधानसभा उमेदवारी मिळाली आणि निवडूनही आले. परंतु त्यांचे तलासरी तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत वनवासी कल्याण केंद्र चालवून वणगा, सवरांसारख्या ३/४ पिढ्या ... Read More »

पालघर जिल्ह्यासाठी आशादायक असे पॉलिटिकल करेक्शन करणारे निकाल

Sanjeev Joshi/Rajtantra Media: राज्याच्या सार्वत्रिक निवडणूकांचे पालघर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे निकाल पहाता ते पॉलिटिकल करेक्शन करणारे, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे असे आहेत. या निकालांतून पालघर जिल्ह्यासाठी आशादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्याला विरोधी पक्ष मिळाले आहेत. खरे तर पुर्वाश्रमीच्या अखंड ठाणे जिल्ह्यातील सध्याच्या पालघर जिल्ह्यामध्ये समाविष्ट झालेल्या भागात भाजपच्या तुलनेने शिवसेनेचा अधिक दबदबा होता. भाजप अस्तित्त्वापुरतीच होती. भाजप राष्ट्रीय ... Read More »

विष्णू सवरांनाच ॲन्टीइन्कम्बन्सी का नडली? ते सॉफ्ट टार्गेत ठरले का?

दि. २६ ऑक्टोबर २०१९ (संजीव जोशी):- विष्णू सवरा एक मितभाषी आणि कर्तबगार व्यक्तिमत्त्व, कधीही वादग्रस्त न ठरलेले व्यक्तीमत्व, विक्रमगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना प्रश्नांकित का झाले? त्यांचा राजकीय वारस या मतदारसंघातून पराभूत का झाला? या पराभवाला खरेच विष्णू सवरा यांचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरला का? ॲन्टीइन्कम्बन्सीची झळ या मतदारसंघाला सोसावी लागली का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करु या.विष्णू सवरा हे विद्यार्थीदशेपासून ... Read More »

अरबी समुद्रात चक्रीवादळ; मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये!-जिल्हाधिकारी

मासेमारीसाठी गेलेल्या 33 बोटी समुद्र किनारी आणण्याच्या प्रयत्नात! राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर दि. 25 : सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असुन या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव कोंकण विभागामध्ये जास्त असल्याने 25 व 26 ऑक्टोबर तसेच पुढील काही काळ मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास ... Read More »

पालघर जिल्ह्यात शिट्टीचाच आवाज

बहुजन विकास आघाडीकडे 3 जागा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपला प्रत्येकी 1 जागा भाजपने दोन्ही जागा गमावल्या सुशिल बागुल/बोईसर, दि. 24 : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये पालघर जिल्ह्यातील 6 जागांपैकी 3 जागा स्वतःकडे राखण्यात बहुजन विकास आघाडीला यश आले आहे. वसई मतदारसंघातून स्वतः हितेंद्र ठाकूर, नालासोपारा मतदारसंघातून क्षितिज ठाकूर यांनी विजय मिळवला. तर बोईसर मतदारसंघातून राजेश पाटील बहुजन विकास आघाडीतून शिवसेनेत ... Read More »

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज! -डॉ. कैलास शिंदे

उमेदवारांची धाकधूक वाढली राजतंत्र न्युज नेटवर्क/ पालघर, दि. 23 : राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी सोमवारी (दि. 21) मतदान पार पडले. उद्या, 24 ऑक्टोबर रोजी राज्यभरात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्यात मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असुन प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. 128-डहाणू, 129-विक्रमगड, 130-पालघर या मतदार संघात प्रत्येकी ... Read More »

Scroll To Top