दिनांक 25 May 2020 वेळ 2:25 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » September » 04

Daily Archives: 04/09/2019

कुपोषण मुक्तीसाठी गणेशोत्सव मंडळांनी अंगणवाड्या दत्तक घ्याव्या; जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

पालघर, दि. 4 : पालघर जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या संपविण्यासाठी शासन आणि प्रशासनामार्फत विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी अंगणवाड्या दत्तक घेऊन बालकांना खाऊचा कोपरा या उपक्रमांतर्गत पोषण आहार पुरवून या प्रयत्नांमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले. सप्टेंबर हा पोषण आहार महिना म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने अंगणवाड्यांमध्ये पुरविल्या जाणार्‍या पोषण आहाराविषयी ... Read More »

हाताची बोटे गमावलेल्या कामगाराला कंपनीने सोडले वार्‍यावर!

हतलब कामगाराची न्यायाची मागणी कुटुंबासह आमरण उपोषण छेडण्याचा इशारा प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : कंपनीत काम करत असताना हाताची बोटे गमावलेल्या कामगाराला कुठल्याही प्रकारची मदत न करता त्याला मागील चार महिन्यांपासुन वार्‍यावर सोडणार्‍या तालुक्यातील हिल्टन फोर्जिंग मेटल कंपनीबद्दल कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मे महिन्यात ही घटना घडली असताना सदर कामगाराला कंपनीने चार महिने पगार किंवा भरपाई न दिल्याने त्याच्या कुटुंबावर ... Read More »

परतीच्या पावसाचा फटका, पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत

डहाणू ते विरारदरम्यान अनेक गाड्यांचा खोळंबा प्रतिनिधी/डहाणू, दि. 4 : गेल्या दोन दिवसांपासून बरसणार्‍या परतीच्या पावसाने मुंबई व पालघर जिल्ह्यासह पश्चिम किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबईसह उपनगरातील भाग जलमय झालाने त्याचा विपरीत परिणाम पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या व लोकल सेवेवर झाला असून डहाणू रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणार्‍या व मुंबईकडून येणार्‍या सर्व गाड्या अनिश्चित काळापर्यंत उशीराने धावत आहेत. ... Read More »

Scroll To Top