दिनांक 25 May 2020 वेळ 12:49 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » September » 01

Daily Archives: 01/09/2019

पालघर येथे बालस्वातंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा

बालशिक्षण तज्ञ प्रा. रमेश पानसेंनी केले मार्गदर्शन प्रतिनिधी/डहाणू, दि. 1 : 31 ऑगस्ट म्हणजे बालशिक्षणाच्या प्रणेत्या पद्मभूषण ताराबाई मोडक यांची पुण्यतिथी व बालशिक्षणतज्ज्ञ मादाम मोंटेसरी यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने त्यांचे बालविकासाचे कार्य समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहचविण्याच्या हेतूने पालघर येथील लायन्स क्लबच्या सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ बालशिक्षणतज्ज्ञ प्रा. रमेश पानसे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ... Read More »

गणेशोत्सवासाठी पालघर जिल्हा पोलीस सज्ज!

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 1 : उद्या, 2 सप्टेंबरपासुन सुरु होणार्‍या गणेशोत्सवासाठी पालघर जिल्हा पोलीस सज्ज असुन हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी ठोस पावले उचलण्यात आलेली आहेत, अशी माहिती पालघर पोलीस दलातर्फे देण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास 2 हजार 719 ठिकाणी सार्वजनिक व 40 हजार 525 ठिकाणी खाजगी गणपती मुर्तीची स्थापना होणार असुन 212 ठिकाणी सार्वजनिक व 3 हजार ... Read More »

वाडा : पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

प्रतिनिधी/वाडा, दि. 1 : दारु पिण्यासाठी पैसे मागणार्‍या तसेच छोट्या-मोठ्या कारणावरुन मुलीला मारहाण करणार्‍या पतीवर कोयत्याने वार करुन त्याला जीवेठार मारणार्‍या पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चंद्रकला चंद्रकांत भोईर (वय 35) असे सदर महिलेचे नाव आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपुर्वी ही घटना घडली होती. चंद्रकांत भोईर हे पत्नी चंद्रकलाकडे नेहमी दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने तसेच छोट्या-मोठ्या ... Read More »

डहाणूत जुगाराचे अड्डे उद्धवस्त; 23 जुगारी अटकेत, दोघे फरार

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 1 : डहाणूतील विविध भागात सुरु असलेले जुगाराचे दोन अड्डे डहाणू पोलीस व पालघर स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या कारवाई करत उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईतून एकुण 23 जुगार्‍यांना अटक करण्यात आली आहे. तर दोघे जण फरार झाले आहे आहेत. तसेच या जुगार्‍यांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जितेंद्र विजय दुबळा (वय 45) याच्या घराच्या बाजूला ... Read More »

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोट्यावधींचे अमली पदार्थ जप्त

दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 1 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीत पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असुन यात अल्प्राझोलम गोळ्यांचा व एम.डी. (मेफ्रेडॉन) पावडरचा समावेश आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असुन त्यांची चौकशी सुरु आहे. महामार्गावरील वसई हद्दीतील सुवी पॅलेस (ससुनवघर) या हॉटेल समोरील गुजरात वाहिनीवर 27 ऑगस्ट ... Read More »

अनियंत्रित झालेल्या एसटी बसने वृद्ध पादचार्‍याचा चिरडले

जखमी पादचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू वाडा येथील घटना प्रतिनिधी/वाडा, दि. 1 : विक्रमगडहुन वाड्याच्या दिशेने येणार्‍या एसटी महामंडळाच्या वाडा आगाराच्या बसला रविवारी सकाळच्या सुमारास मालेफाटा येथे अपघात झाला. बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असुन अनियंत्रित झालेल्या बसने वृद्ध पादचार्‍याला धडक दिल्याने सदर पादचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमगडहुन एम.एच. ... Read More »

Scroll To Top